अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर अजय पुन्हा पंजाबी भूमिकेत समोर आला आहे. 'सन ऑफ सरदार'मध्ये जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अजयसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहे.
२०१२ साली आलेल्या 'सन ऑफ सरदार'ची गोष्ट पंजाबमधली होती. अजय देवगणसमोर संजय दत्त आणि त्याच्या गँगचं आव्हान होतं. त्यातून अजय देवगण कसा वाचतो हे दाखवलं होतं. आता सन ऑफ सरदार २ ची गोष्ट स्कॉटलंडची आहे. अजय देवगणसमोर यावेळी रवी किशन आहे ज्यामुळे सिनेमाला रंगत येणार आहे. तसंच अजय आणि मृणाल ठाकुरची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. संजय मिश्राची क़ॉमेडी आहे. एकुणच सिनेमा फॅमिली एंटरटेनर असल्याचं पाहायला मिळत आहे.
'सन ऑफ सरदार २'चं शूट स्कॉटलंडमध्ये झालं आहे. सिनेमात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, कुब्रा सैत, संजय मिश्रा, बिंदू दारा सिंह यांचीही भूमिका आहे. २५ जुलै रोजी सिनेमा रिलीज होत आहे. हा एक कॉमेडी ड्रामा असणार आहे.