Join us

Bholaa Motion Poster : एक चट्टान, सौ शैतान...; पाहा अजय देवगणचा खतरनाक लुक, ‘भोला’चं मोशन पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:03 IST

Bholaa Motion Poster : काही दिवसांपूर्वी अजयने ‘भोला’चा टीझर रिलीज केला होता. या टीझरने चाहत्यांना वेड लावलं होतं. आता अजयने ‘भोला’चं नवं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे.

Bholaa Motion Poster: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणच्या  ( Ajay Devgn ) नुकत्याच रिलीज  ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता  त्याच्या ‘भोला’ (Bholaa ) या आगामी सिनेमानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अजयने ‘भोला’चा टीझर रिलीज केला होता. प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल, असं सगळं काही या टीझरमध्ये होतं. अजय देवगणचा सॉलिड लुक, दमदार अ‍ॅक्शन, जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक असं सगळं काही असलेल्या या टीझरने चाहत्यांना वेड लावलं होतं. आता अजयने ‘भोला’चं नवं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. यात अजयचा लुक रिव्हील करण्यात आला आहे.

‘भोला’ हा अजयच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. या वन मॅन आर्मी सिनेमात अजय एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. 

अजय देवगण व तब्बूचा ‘भोला’ 30 मार्च 2023 रोजी रिलीज होतोय. अजयने नवं मोशन पोस्टर रिलीज करत खुद्द ही माहिती दिली. ‘एक चट्टान, सौ शैतान’ असं मोशन पोस्टरवर लिहिलेलं दिसतं. बडा बवाल काटे हो, अरे का नाम है तुम्हाला मरदवा?, असा बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज ऐकू येतो. यानंतर अजयचा आवाज ऐकायला मिळतो. दिखे होते तो तू नहीं दिखता, असं तो म्हणतो.

या मोशन पोस्टरमध्ये अजयचे वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. हे पोस्टर रिलीज होताच, चाहते के्रझी झाले आहेत. हा सिनेमा अजयने स्वत: दिग्दर्शित केला आहे. चित्रपट तामिळ चित्रपट ‘कॅथी’चा रिमेक आहे.   ओरिजनल सिनेमात साऊथ स्टार कार्थी लीड रोलमध्ये होता. ‘भोला’मध्ये अजय देवगण लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत तब्बू, संजय मिश्रा व दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘कॅथी’ एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. अजय देवगण  हिंदी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 3 डीमध्ये घेऊन येतोय.  

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूड