Join us

Ajay Devgan : 'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:36 IST

शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यानेही 'पठाण' सिनेमावर भाष्य केले आहे.

Ajay Devgan :  शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) उद्या २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यानेही 'पठाण' सिनेमावर भाष्य केले आहे. 'पठाण' साठी अजय देवगण देखील तितकाच खूश दिसत आहे.

अजय देवगण च्या आगामी भोला (Bhola) सिनेमाचे दुसरे टीझर आज लॉंच झाले. लॉंच दरम्यान माध्यमांनी अजय देवगणला शाहरुखच्या पठाण सिनेमावर प्रश्न विचारला असता, अजय म्हणाला, जो सिनेमा रिलीज होईल तो सुपरडुपर हिट होऊ दे कारण ही एकच फिल्म इंडस्ट्री आहे. पठाणचे ज्या पद्धतीने अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहेत आजपर्यंत असे कधी झाले नाही हे बघून मी खूप खूश आहे.'

पठाणने रिलीज आधीच रेकॉडतोड कामगिरी केली आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला २० जानेवारी पासूनच सुरुवात झाली.चाहत्यांचा प्रतिसाद पाहता पहिल्याच दिवशी पठाण ची कमाई कोटीच्या घरात जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :पठाण सिनेमाअजय देवगणशाहरुख खानदीपिका पादुकोण