Join us

Ajay Devgan, Kajol : पहिल्या भेटीनंतर अजयला पुन्हा पाहायचं नव्हतं काजोलचं तोंड, पण…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 08:00 IST

Ajay Devgan, Kajol : अजय व काजोल हे दोघंही म्हणजे दोन टोकं. अजय कमालीचा शांत आणि काजोल तितकीच बडबडी. पण तरीही या दोघांचं जुळलं. पण त्यांची पहिली भेट मात्र फारच वाईट होती...

Ajay Devgan, Kajol : अजय देवगणकाजोल हे बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजयशी लग्न केलं. खरं तर अजय व काजोल हे दोघंही म्हणजे दोन टोकं. अजय कमालीचा शांत आणि काजोल तितकीच बडबडी. पण तरीही या दोघांचं जुळलं. पण त्यांची पहिली भेट मात्र फारच वाईट होती. हाेय, पहिल्या भेटीत अजयला काजोल अजिबात आवडली नव्हती. १९९५ मध्ये हलचल सिनेमाच्या सेटवर अजय व काजोल पहिल्यांदा भेटले होते आणि यापुढे ही कधीच भेटायला नको, अशी त्यावेळी अजयच्या मनाची अवस्था होती. एका मुलाखतीत अजयने त्याच्या व काजोलच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं. 

तो म्हणाला होता की, जेव्हा मी काजोलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती मला अजिबात आवडली नव्हती. ती मला फारच अहंकारी वाटली होती. मोठ्यानं बोलणं आणि सततची बडबड त्यामुळे तिला पुन्हा भेटायची इच्छा देखील नव्हती. स्वभावाच्या बाबतीत आम्ही खूप वेगळे होतो, पण मला वाटतं जे नशिबात लिहिलं आहे तेच होतं. 

त्या दिवशी काजोल पहिल्यांदा हलचलच्या सेटवर पोहोचली होती आणि तिच्या हिरोला शोधत होती. माझ्यासोबत कोण हिरो आहे, असं तिने सेटवरच्या लोकांना विचारलं आणि कोणीतरी दूर बसलेल्या अजयकडे बोट दाखवलं. अजय एका कोपऱ्यात बसला होता. पहिल्या दिवशी अजय काजोलशी स्वत:हून एक शब्दही बोलला नव्हता. अगदी शॉट झाला की, तो निघून जायचा. काजोल त्याच्या या वागण्यामुळे अर्थातच वैतागली होती. पण हळूहळू दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मग चांगली मैत्री झाली.  काजोल अजयच्या आयुष्यात आली तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. काजोलही दुसऱ्याच एका मुलाच्या प्रेमात होती. काजोल अजयकडे बाॅयफ्रेन्डच्या तक्रारी करायची. काहीच दिवसांत काजोलचं ब्रेकअप झालं. अजय व काजोलने एकमेकांना प्रपोज केलं नाही. पण ते एकत्र होते.

1999 मध्ये दोघांनी महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार लग्न केलं.  अजयच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणं बंद केलं होतं. काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावं, असं तिच्या वडिलांना वाटत होतं. पण काही दिवसांनी ते सुद्धा राजी झालेत आणि काजोल व अजय कायमचे लग्नबेडीत अडकले.  

टॅग्स :अजय देवगणकाजोलबॉलिवूड