Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायच्या एका वर्तणूकीमुळे आलं वादळ! अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून सासूबाईंना वगळणं आलं अंगाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 15:59 IST

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सून ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतंय.

अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबरला त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिने तिच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचा आजी आजोबा आराध्या आणि भाऊ अगस्त्य नंदा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. बिग बींच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला. मात्र, ऐश्वर्या राय बच्चनने हाच फोटो तिच्या इंस्टाग्रामवर क्रॉप करून पुन्हा पोस्ट केला. ऐर्श्वयानी शेअर केलेला फोटो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा बच्चन कुटुंबियांमधील मतभेद समोर आलेत.

ऐश्वर्या रायच्या फोटोमध्ये फक्त अमिताभ बच्चन आणि आराध्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्याने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले- 'God bless'. फोटोमध्ये आराध्या तिचे आजोबा अमिताभ यांना मिठी मारताना दिसत आहे. 

आता हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर ऐशला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केलीय. कारण तिने हा क्रॉप केलेला आहे. संपूर्ण फोटोमध्ये अमिताभ बच्चन नव्या, आराध्या, अगस्त्य आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासोबत पोज देताना दिसले. मात्र, ऐश्वर्या रायने शेअर केलेल्या फोटोमध्ये नव्या, अगस्त्य तसेच जया बच्चन दिसत नाहीत. यावरुन तिला ट्रोल करण्यात येतेय. तुला फक्त आराध्या आणि बिग बी यांचा फोटो पोस्ट करायचा होता तर तू दुसरा फोटो शेअर करू शकली असतीस, हे खरचं खूप वाईट आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनजया बच्चन