Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:15 IST

लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या. अखेर शत्रुघ्न यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिलाय (shatrughna sinha, sonakshi sinha)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत २३ जूनला रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर संध्याकाळी सोनाक्षीने बॉलिवूड कलाकार, कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी रिसेप्शन ठेवलेलं. सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न काही दिवसांनी आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. अखेर शत्रुघ्न सिन्हांनी ट्विट करुन या सर्व चर्चांवर मौन सोडून त्यांची प्रतिक्रिया दिलीय. 

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर शत्रुघ्न सिन्हांची पहिली प्रतिक्रिया

शत्रुघ्न सिन्हांनी सोशल मीडियावर T20 WC ची फायनल मॅच बघतानाचे फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करुन शत्रुघ्न लिहितात, "सर्व वाद आणि गोंधळापासून दूर... माझ्या मित्रांसोबत. वस्तुस्थिती अशी आहे की, मी माझे कुटुंब, भाऊ आणि काही मित्रांसह सर्वात T20 विश्वचषक सामन्याचा आनंद लुटला." पुढे शत्रुघ्न यांनी टी २० विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कारणासाठी शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर लेक सोनाक्षीचे लग्न यादरम्यान त्यांची खूप धावपळ झाली होती. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण आला होता. त्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पण आता मात्र शत्रुघ्न हॉस्पिटलमधून घरी आले असल्याने त्यांच्या चाहत्यांची चिंता दूर झाली आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाजहीर इक्बालशत्रुघ्न सिन्हाहॉस्पिटलबॉलिवूड