बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत चार दिवसांच्या मुंबईतील मुक्कामानंतर हिमाचल प्रदेशात आपल्या घरी परतली आहे. मुंबईहून चंदीगडला परतल्यानंतर तिला 10 दिवस क्वारंटाईन केले आहे. मुंबई कंटेनमेंट झोन असल्यामुळे खबरदारी म्हणून हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागाने कंगनाला क्वारंटाईन केलं आहे. पुढील 10 दिवस कंगना कुठेही बाहेर जाऊ शकणार नाही. क्वारंटाईन काळ संपण्याच्या आधी कंगनाची पुन्हा एकदा कोव्हिड 19ची टेस्ट होईल. या टेस्टच्या रिपोर्टनंतर कंगनाचा क्वारंटाईन काळ संपणार की नाही ते ठरणार आहे. चंदीगड येथे पोहोचताच कंगनाने एक ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबईतून निघतानाही कंगनाने शेरोशायरीतून निशाणाकंगनाने ट्विटमध्ये म्हटले होते की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले होते.
तर ती मला क्लॅप बॉय बनवेल...! कंगना राणौतबद्दल बोलले विक्रम भट