Join us

एकमेकांचे हात धरुन शिल्पा-राज कुंद्रा देवीच्या दर्शनाला; Photo होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:43 IST

Raj kundra: राज आणि शिल्पाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राज पहिल्यांदाच पब्लिक प्लेसमध्ये शिल्पाचा हात धरून चालत असल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अनेकदा फिटनेसमुळे चर्चेत येणारी शिल्पा सध्या तिच्या पती राज कुंद्रामुळे (Raj Kundra)  चर्चेत येत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची जामीनावर सुटका झाली असून सध्या तो सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच राज कुंद्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राचं नाव आल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. अलिकडेच राजची जामीनावर सुटका झाली असून त्याने सोशल मीडियावरील त्याच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. परंतु, तरीदेखील सोशल नेटवर्किंगवर त्याची चर्चा रंगत असते. त्यातच राज आणि शिल्पाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राज पहिल्यांदाच पब्लिक प्लेसमध्ये शिल्पाचा हात धरून चालत असल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर जामीन झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर तो कॅमेरात कैद झाला आहे.

ज्वालादेवी मंदिरात दर्शनासाठी राज-शिल्पा

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राज आणि शिल्पा ज्वालादेवी मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या फोटोमध्ये दोघंही देवळातील पुजाऱ्यांकडून देवीचा प्रसादही घेत असल्याचं दिसून येत आहे. शिल्पानेदेखील यावेळचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

राजचे सोशल मीडिया अकाऊंट्स झाले डिलीट

पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये राजची जामीनावर सुटका झाली. परंतु, सुटका झाल्यानंतर राजने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केले. तसंच तो लाइमलाइटपासूनही दूर राहू लागला आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रासेलिब्रिटीबॉलिवूड