Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert! मलायकानंतर मंदिरा बेदीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, फोटो पाहून बोलती होईल बंद....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 16:48 IST

आता अभिनेत्री मंदिरा बेदीने एक बिकिनी फोटो  शेअर केला असून त्याचीही चर्चा रंगली आहे. मंदिराचे फोटो पाहून हेच म्हणता येईल की, मलायका प्रमाणे मंदिरानेही आपल्या वयाला मात दिली आहे.

एक दिवसाआधीच मलायका अरोराने तिचा एक फारच हॉट आणि जबरदस्त असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोचं फॅन्सनी भरभरून कौतुक केलं आणि हा फोटो व्हायरलही झाला. या फोटोची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. अशात आता अभिनेत्री मंदिरा बेदीने एक बिकिनी फोटो  शेअर केला असून त्याचीही चर्चा रंगली आहे. मंदिराचे फोटो पाहून हेच म्हणता येईल की, मलायका प्रमाणे मंदिरानेही आपल्या वयाला मात दिली आहे. 

मंदिराचा हा फोटो जुना आहे. ती त्यावेळी सुट्टी एन्जॉय करायला गेली होती. येलो बिकिनीमध्ये ती पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मंदिराने कॅप्शन लिहिले की, 'जसंही तापमान कमी होऊ लागलं, तेव्हा सूर्य, समुद्र आणि वाळूची आठवण येऊ लागते. माझ्या फोनने मला आठवण दिली की, हा फोटो पोस्ट केला नाही'.

हे पहिलीच वेळ नाही की, मंदिराने आपला इतका हॉट फोटो शेअर केलाय. याआधीही अनेकदा तिने हॉट फोटो आणि व्हिडीओज, वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि व्हायरल होतात.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' सिनेमात दिसली होती. तसेच काही वेबसीरीजमध्येही दिसली. पण ती तिच्या कामाऐवजी तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. 

टॅग्स :मंदिरा बेदीबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल