Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण आणि क्रिती सनॉननंतर आता करीना कपूर बनणार 'सीता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:03 IST

अभिनेत्री करीना कपूर खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. काही दिवसांपूर्वी सीता संदर्भातील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे आणि यासोबत सीताची भूमिकेत कोण अभिनेत्री दिसणार आहे, हे समोर आले आहे. सीता बनणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता करीना कपूरचे नाव जोडले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी अलौकिक देसाईने आगामी चित्रपट 'सीता-द इनकार्नेशन'ची घोषणा केली होती. या घोषणेसोबतच सीताच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध घेण्यास सुरूवात झाली होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आता सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जर करीनाने या भूमिकेला होकार नाही दिला तर ही भूमिका आलिया भटच्या पदरी पडू शकते.

अलौकीक देसाईने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, मला आणि केवी विजेयेंद्र प्रसादला वाटते की करीना सीताच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. निर्मात्यांना वाटते आहे की, त्यांचा सिनेमा सीतेच्या दृष्टीकोनातून बनवला जाणार आहे. त्यामुळे इतर रामायणावर आधारीत सिनेमांपेक्षा हा सिनेमा वेगळा आहे. तसेच आलिया भटच्या नावाचाही विचार केला होता पण निर्मात्यांची पहिली पसंती करीनाला आहे आणि यासाठी तिला अप्रोचही केले आहे.

अलौकीक देसाईने पुढे सांगितले की, करीनालाही चित्रपटाची कॉन्सेप्ट आवडली आहे. कारण चित्रपटात तिला इतर रामायमावर आधारीत चित्रपटांच्या तुलनेत जास्त स्क्रीन टाइम मिळणार आहे. कारण चित्रपट सीतेच्या जीवनावर आधारीत आहे आणि यात ती मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या करीनाची टीम शूटिंगसाठी तिच्या डेट्सवर आणि फिसवर काम करत आहे. जसे सर्व औपचारिकता पूर्ण होईल तसे अधिकृत जाहीर केले जाईल. जर करीना सोबत जुळून नाही आले तर दुसरी चॉइस आलिया भट आहे. केवी विजेयेंद्र सुपरहिट सिनेमा बाहुबलीचे लेखक आहेत.

ओम राउतचा चित्रपट आदिपुरूषमध्ये क्रिती सनॉन सीताच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मधु मंटेना यांच्या रामायण थ्रीडीमध्ये दीपिका पादुकोण सीताची भूमिका साकारताना दिसू शकते.

टॅग्स :करिना कपूरक्रिती सनॉनदीपिका पादुकोण