Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आर्टिकल 370' नंतर यामी गौतम अभिनय क्षेत्र सोडणार? समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:48 IST

'आर्टिकल 370' नंतर यामी गौतम अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय

यामी गौतम (Yami Gautam)  ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री. यामीने 'विकी डोनर', 'बदलापूर', 'उरी', 'काबील' अशा अनेक सिनेमांमधून लोकांच्या मनावर राज्य केलंय. यामीने विविधरंगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. यामीचा आगामी 'आर्टिकल 370' (Article 370) सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाच्या टिझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. अशातच 'आर्टिकल 370' नंतर यामी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'आर्टिकल 370' च्या ट्रेलर लॉंचला यामी गरोदर असल्याचा खुलासा झाला. तिचा नवरा आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य धर तिची काळजी घेताना दिसला. 'आर्टिकल 370' नंतर यामी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकणार अशी चर्चा आहे. यामागचं कारण म्हणजे.. गरोदरपणाचा काळ आणि बाळ झाल्यानंतर त्याच्याकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी यामी अभिनय क्षेत्र सोडणार अशी चर्चा आहे. याशिवाय ती पूर्णपणे अभिनय क्षेत्र सोडणार नाही तर, निर्माती म्हणून इतर जबाबदारी पार पडेल असंही सांगण्यात येत आहे. यामीने अभिनय क्षेत्र सोडलं तर तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल, यात शंका नाही.

 'आर्टिकल 370' च्या ट्रेलरला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. या सिनेमातून काश्मिरमध्ये पेटणाऱ्या ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्यात आलंय. सिनेमात यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत अभिनेते अरुण गोविल झळकत आहेत. 'आर्टिकल 370' सिनेमा २३ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होतोय. 

 

टॅग्स :यामी गौतमबॉलिवूडकलम 370