काही महिन्यांपूर्वी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. अरिजीतच्या या निर्णयाने संगीतविश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. आता अरिजीतनंतर आणखी एका गायकाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. याशिवाय सध्याच्या संगीत सृष्टीवर निशाणा साधला आहे. ही गायिका म्हणजे इशानी दवे. इशानीने सोशल मीडियावर पोस्ट करुन तिच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.इशानीची पोस्ट व्हायरलइशानीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट करुन लिहिलं की, ''एकेकाळी संगीत म्हणजे श्वास घेण्याइतकं सोपं, प्रामाणिक आणि जिवंत होतं. प्रत्येक स्वर कुठल्यातरी खऱ्या भावनेतून निर्माण होत असे. रंगमंचावर गाण्याचं सादरीकरण करणं माझ्यावर कधीच दडपणाचं नव्हतं, तर ते माझं घर होतं. पण मग सारं काही बदलून गेलं. ज्या गोष्टीवर मी जिवापाड प्रेम केलं, तिचं रूपांतर हळूहळू एका बेडीत झालं. स्वप्नांची जागा डेडलाईन्सने घेतली, मनातील भावनांची जागा अपेक्षांनी घेतली आणि या सगळ्या प्रवासात कुठेतरी मी स्वतःलाच हरवून बसले.''
''मी गाणं सुरूच ठेवलं, पण पूर्वीसारखं काही वाटत नव्हतं. माझा सूर आणि आवाज होता, पण त्यात आत्मा उरला नव्हता. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल? तर ज्या गोष्टीवर मी इतकं मनापासून प्रेम केलं, तिच गोष्ट आता मला जड वाटू लागली होती. मी संगीत हरवलंय असं मला वाटत नाही. कदाचित मी संगीताकडे जाणारी माझी वाट हरवून बसले आहे.''
''कदाचित एखाद्या दिवशी मला माझी जुनी 'मी' पुन्हा सापडेल—अशी मुलगी जी कुणीतरी ऐकावं म्हणून नाही, तर स्वतःच्या आत खोलवर दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी गाईल. पुन्हा भेटूयात एका नव्या वळणावर!'', अशी पोस्ट लिहून इशानीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तिच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ''तू तुझा वेळ घे आणि परत कमबॅक कर'', अशा शब्दात इशानीच्या चाहत्यांनी तिला धीर दिला आहे.
Web Summary : After Arijit Singh, singer Ishani Dave hints at retirement via social media. She expressed disillusionment with the current music scene and feeling disconnected from her passion, leaving fans disheartened.
Web Summary : अरिजीत सिंह के बाद, गायिका ईशानी दवे ने सोशल मीडिया के माध्यम से संन्यास का संकेत दिया। उन्होंने वर्तमान संगीत परिदृश्य से मोहभंग और अपने जुनून से अलग होने की बात कही, जिससे प्रशंसक निराश हैं।