Join us  

'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:01 PM

आजच्या 'वर्ल्ड रेडिओ डे' निमित्ताने साराच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे (Ae Watan Mere Watan, Sara Ali Khan)

कन्नन अय्यर दिग्दर्शित सत्य घटनेवर आधारित 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरब फारुकी आणि अय्यर यांनी लिहिलेल्या या चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर चित्रपटात इमरान हाश्मी (Emran Hashmi) एका खास कॅमिओमध्ये दिसणार आहे. जागतिक रेडिओ दिनानिमित्त  OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने प्रेक्षकांना एक मोठी भेट दिली आहे. 

'ए वतन मेरे वतन' या ऐतिहासिक थ्रिलर-ड्रामाच्या प्रीमियरची तारीख उघड करण्यात आली आहे. चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे.  हा चित्रपट धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शन द्वारे निर्मित असून करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. याशिवाय चित्रपटात सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी हे स्टार्सही झळकणार आहेत.

'ए वतन मेरे वतन' सिनेमा स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. उषा मेहता यांनी गुप्त रेडिओच्या माध्यातून भारतातील तरुणांना ब्रिटीश राजवटी विरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे ब्रिटीशांविरोधातल्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा मिळाली. सारा अली खानचा हा नवा सिनेमा २१ मार्चला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसचिन खेडेकरइमरान हाश्मीकरण जोहर