Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी मारलं, मग फोनच फेकून दिला; भर कॉन्सर्टमध्ये आदित्यचं चाहत्याबरोबर गैरवर्तन, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 11:21 IST

कॉन्सर्टदरम्यान आदित्यने चाहत्याबरोबर केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर नेटकरी संतापले आहेत.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा लेक आदित्य नारायणगी गायक आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत आलेल्या आदित्यला मात्र तेवढं स्टारडम मिळालं नाही. अनेक रिएलिटी शोमध्ये तो अँकरिंग करताना दिसून आला. सध्या एका कॉन्सर्टमधील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आदित्य छत्तीसगडमधील एका कॉलेजमधील कॉन्सर्ट होस्ट करण्यासाठी गेला होता. पण, या कॉन्सर्टदरम्यान त्याने चाहत्याबरोबर केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर नेटकरी संतापले आहेत. या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आदित्य शाहरुख खानच्या डॉन सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे. त्यादरम्यानच स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या चाहत्याला आदित्य मारतो. त्यानंतर त्याच्या हातातील फोन घेतो आणि फेकून देत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

कॉन्सर्टमध्ये आदित्यने चाहत्याबरोबर केलेलं गैरवर्तन पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे. आदित्यचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आदित्यने चाहत्याबरोबर असं वर्तन का केलं? याबाबत अजून त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

टॅग्स :आदित्य नारायणसेलिब्रिटी