आदित्य धर यांचा 'धुरंधर:द रिव्हेंज' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आहे. आतापर्यंत या सिनेमाने १६६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच सिनेमाच्या कथेसोबतच पडद्यामागची कहाणी ऐकण्यासाठीही प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत. त्यामुळे आदित्य धर सुद्धा अनेक मुलाखतींमध्ये सिनेमाच्या मेकिंगचे किस्से सांगत आहेत. यामध्येच या सिनेमासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या सिनेमासाठी तब्बल १० हजार कॉस्ट्यूम डिझाइन करण्यात आले होते.
आदित्य धर यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचे काही बिहाईंड द पिक्चर्स शेअर केले आहेत. यात ते कॉस्ट्यूम डिझायनर स्मृती चौहानसोबत दिसून येत आहेत. या फोटोमध्ये दोघेही सिनेमातील कॉस्ट्यूमवर चर्चा करतांना दिसत आहेत. या सिनेमासाठी जवळपास १० हजार कपडे तयार करण्यात आले होते. यातील २५० कपडे तर फक्त रणवीर सिंहसाठी होते. आणि, १ हजार पठाणी कुर्ता-पजामा हे सिनेमातील ज्युनिअर आर्टिस्टसाठी तयार करण्यात आले होते.''माझी प्रिय स्मृती, मला आजही आपल्या सुरुवातीचं बोलणं लक्षात आहे. जेव्हा आपण बोललो होतो की, जसकीरतच्या भूमिकेची सुरुवात हलक्या फिक्या रंगाने होते. आणि, जसंजसा तो शेवटापर्यंत पोहोचतो त्यावेळी हमजा पूर्णपणे काळ्या रंगात बुडून जातो. कसं ना. कुठे ना कुठे तरी रंग सुद्धा गुपचूपपणे त्याच्या आयुष्यातून हळूहळू निघून जातात. आणि, कोणाचंही लक्ष न वेधून घेता हे सगळं होतं'', असं कॅप्शन आदित्य यांनी या पोस्टला दिलं आहे.
पुढे ते लिहितात, ''तू अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने तीच गोष्ट केली जे काम करण्यात तू पटाईत आहेस. तू खरंच खूप उत्तम काम केलंस. एका सिनेमासाठी १० हजार कॉस्ट्यूम कोण डिझाइन करतं? आणि, पहिल्याच ३० दिवसात जवळपास १ हजार पठाणी शिवून देतं? विशेष म्हणजे एवढी मेहनत करुनही ज्युनिअर आर्टिस्टच्या मनगटावरील शर्टच्या बटणांची तुला चिंता होती. हमजासाठी कोणी २५० पेक्षा जास्त लूक तयार केले असते. पण, तू केलं.''
दरम्यान, आदित्यने सोशल मीडियावर स्मृती चौहानसाठी मोठी पोस्ट लिहिली आहे. त्याने या सिनेमाच्या यशामध्ये तिलाही श्रेय दिलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील हमजाच्या लूकची बरीच चर्चा झाल्याचं दिसून आलं.
Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar: The Revenge' is a box office hit. Over 10,000 costumes were created for the film, including 250 outfits for Ranveer Singh and 1,000 Pathani kurtas for junior artists. Dhar praised costume designer Smriti Chauhan's dedication to detail.
Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर: द रिवेंज' बॉक्स ऑफिस पर हिट है। फिल्म के लिए 10,000 से अधिक कॉस्ट्यूम बनाए गए, जिसमें रणवीर सिंह के लिए 250 ऑउटफिट और जूनियर कलाकारों के लिए 1,000 पठानी कुर्ते शामिल हैं। धर ने कॉस्ट्यूम डिजाइनर स्मृति चौहान के समर्पण की प्रशंसा की।