Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 18:59 IST

सुशांतसिंह राजपूतने २०२० मध्ये याच फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर या फ्लॅटमध्ये राहायला कोणीही तयार नव्हतं.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मुंबईतील बांद्रा येथील समुद्रकिनारी असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहायचा. त्याच्या आत्महत्येनंतर कोणीही तो फ्लॅट खरेदी करायला तयार नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) फ्लॅट घेतल्याची चर्चा होती. आता अखेर तिने स्वत:च याबाबत खुलासा केला आहेत. ४ महिन्यांपूर्वीच अदा शर्मा सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. या घरात आल्यावर तिला नेमकं कसं वाटतंय हेही तिने सांगितलं. 

'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अदा शर्मा म्हणाली, "मी चार महिन्यांपूर्वी बांद्रा येथील मोंट ब्लँक अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. पण मी एकामगोमाग एक माझे चित्रपट 'बस्तर' आणि मग 'द केरळ स्टोरी'च्या ओटीटी रिलीजमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी काही दिवस मथुरेतील एलिफंट सेंच्युरीमध्ये राहिले. आता नुकतंच मला काही दिवस मिळाले तेव्हा मी या घरात सेटल झाले आहे."

ती पुढे म्हणाली, "मी आतापर्यंत पाली हिल बांद्रामधील एकाच घरात राहिले आहे. पहिल्यांदाच मी त्या घरातून शिफ्ट झाले. कुठेही गेलं तरी तिथल्या वाईब्स(ऊर्जा) बाबतीत मी हळवी असते. ही जागा मला पॉझिटिव्ह वाईब्स देते. केरळ आणि मुंबईतील आमच्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत.  आम्ही पक्ष्यांना, खारींना दाणे देतो. म्हणूनच मला असंच घर हवं होतं जिथून सुंदर नजारा दिसेल आणि मी पक्ष्यांना दाणे टाकू शकेन. मी कधीच लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही आणि नेहमी मनाचं ऐकलं. म्हणूनच या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याबाबत माझ्या मनात थोडीही शंका नव्हती."

अदा शर्माने सुशांतचं हे घर 5 वर्षांसाठी भाड्याने घेतलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने अॅग्रीमेंट केलं. १४ जून २०२० रोजी कोव्हिडच्या काळात सुशांतसिंह राजपूतने याच फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड उलथापालथ झाली होती.

टॅग्स :अदा शर्मासुशांत सिंग रजपूतसुंदर गृहनियोजनमुंबई