Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात राहताना भीती वाटते का? अदा शर्मा म्हणाली, 'तुम्ही जर चुकीचं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:09 IST

अदा शर्मा काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या बांद्रा येथील घरात शिफ्ट झाली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. चाहते हळहळले. आजही कोणीच या धक्क्यातून सावरलेलं नाही. त्या दिवसापासून सुशांतचं ते घर रिकामं आहे. तो तिथे भाड्यानेच राहत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वीच 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा त्या घरात शिफ्ट झाली. जिथे अभिनेत्याने आत्महत्या केली तिथे राहायला भीती वाटली नाही का? यावर अदा शर्माने उत्तर दिलं आहे.

अदा शर्मा लवकरच विक्रम भट यांच्या आगामी 'तुमको मेरी कसम' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनला इव्हेंटनंतर अदाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी instant bollywood शी बातचीत करताना तिला सुशांतच्या घरात राहायला भीती वाटली नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "भीती वाटली पाहिजे का? जर तुम्ही आयुष्यात काहीच चुकीचं केलेलं नाही तर मग कशाची भीती? जर तुम्हाला कशाचा पश्चात्ताप होत असेल किंवा तुम्ही काही चुकीचं केलं असेल तर मग भीती वाटेल."

ती पुढे म्हणाली, "एखादा व्यक्ती जीवंत असतो तेव्हा त्याची कोणालाच पडलेली नसते. पण जेव्हा तो जातो तेव्हा सर्वजण त्याच्याबद्दल बोलतात. हे मला फार विचित्र वाटतं. मला कळत नाहीए या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. पण या घरातली vibe खूप छान आहे एवढंच मी सांगेन."

काही दिवसांपूर्वीच अदाला तिने सुशांतचं घर विकत घेतलं आहे का असं विचारण्यात आलं होतं. यावर ती म्हणाली होती की 'हे घर विकत घेण्याची माझी क्षमता नाही. ३०० कोटींचं ते घर आहे सुशांतही तिथे भाड्यानेच राहत होता.' सुशांतच्या या घरात भजन म्हणतानाचा अदाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

 

टॅग्स :अदा शर्मासुशांत सिंग रजपूतबॉलिवूड