Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री जरीन खानने अद्याप का नाही केलं लग्न? 'हे' आहे कारण, स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 12:18 IST

जरीनचे फॅन फॉलोव्हिंग खूप मोठे आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने 'वीर' सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण तिला बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. पण, जरीन खानला बॉलिवूडमध्ये फारसं यश आलं नाही. जरीन सध्या कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर तिचा चांगला वावर आहे. जरीन खानने वयाची ३७शी गाठली असली तरी ती अद्याप सिंगल आहे. तिने लग्न न करण्याचे कारण समोर आले आहे. याबद्दल तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

जरीनचे फॅन फॉलोव्हिंग खूप मोठे आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अनेकांना तिने अद्याप लग्न का नाही केले, हे जाणून घ्यायचे आहे. जरीनने २०२०मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स' ला मुलाखत दिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, 'आजकाल लग्न म्हणजे मस्करी झालीये. मी २-३ महिन्यात लग्न मोडताना मी बघितली आहेत. माझ्यासाठी लग्न हा एक मोठा निर्णय आहे. मला माझ्या आजी-आजोबांसारखं लग्न करायचं आहे, जे शेवटपर्यंत टिकेल आणि अडचणींमध्ये कधी साथ नाही सोडणार'. 

जरीन खानचा जन्म सन 1987 मध्ये मुंबईत येथे झाला होता. 12 वीत असताना जरीनच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी जरीनच्या खांद्यावर आली. जरीनला डॉक्टर व्हायचं होतं. पण वडील घरातून निघून गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली होती, म्हणून जरीनने तिचा अभ्यास  सोडून घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जरीनने वीर या चित्रपटानंतर हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ या चित्रपटांमध्ये काम केले. पण जरीनला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.  

टॅग्स :जरीन खानसेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खान