Join us

अभिनेत्री उर्वशी रौतेला या इजिप्शियन सुपरस्टारसोबत शेअर करणार स्क्रिन, जाणून घ्या याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:47 IST

फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सना सरप्राईज देत असते. उर्वशीने तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याने बरेच रॅमवॉकवर आपला जलवा दाखवला आहे. उर्वशी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं. बॉलिवूडची दिवा उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकली होती.  आता उर्वशी लवकरच इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

याविषयी बोलताना अभिनेता मोहम्मद रमदान म्हणाला, "उर्वशी बॉलिवूडमधील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.. मला खात्री आहे कि तिला आपण लवकरच हॉलिवूडमध्ये बघाल. उर्वशी बरोबर काम करायला मला नक्कीच मजा येणार आहे आणि हे एक सुंदर अनुभव असणार.''

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अखेरची ती व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उर्वशी सध्या तिच्या आगामी तेलगू चित्रपट “ब्लॅक रोझ” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली होती. 

टॅग्स :उर्वशी रौतेला