बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). देसी गर्ल म्हणून नावारुपाला आलेली प्रियांका आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. म्हणूनच, तिच्यासोबत काम करायला अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असतात. परंतु, या सगळ्यामध्येच एका अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
'प्रियांकासोबत काम करणं परवडणारं नाही', असं वक्तव्य अभिनेत्री आणि प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्रा हिने केलं आहे. प्रियांकाप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मीराने काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, तिला म्हणावं तसं यश आलं नाही. अभिनयानंतर मीरा निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'गांधी टॉक्स' या सिनेमाची निर्मिती मीराने केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने प्रियांकासोबत काम करण्याविषयी भाष्य केलं आहे.
''पुढे भविष्यात तू निर्मिती केलेल्या सिनेमात अभिनेत्री आणि तुझी बहीण प्रियांका चोप्राला घेणार का?'' असा प्रश्न मीराला विचारण्यात आला. त्यावर मीराने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरलं. '' नाही, नाही. सध्या तरी मी तसं काहीच करु शकत नाही.कारण, तिला सिनेमात घेणं हे मला परवडणारं (आर्थिकदृष्ट्या) नाही. मी स्वप्नात सुद्धा हा विचार करु शकत नाही. पण, जेव्हा मी खूप मोठी सिनेनिर्माता होईन त्यावेळी नक्कीच एक दिवस प्रियांकाला माझ्या सिनेमात घेईन," असं मीरा म्हणाली.
Web Summary : Meera Chopra stated casting Priyanka in her films is financially unviable now. While producing 'Gandhi Talks', Meera hopes to cast her globally renowned cousin in the future when she becomes a bigger producer.
Web Summary : मीरा चोपड़ा ने कहा कि प्रियंका को अपनी फिल्मों में लेना आर्थिक रूप से संभव नहीं है। 'गांधी टॉक्स' का निर्माण करते हुए, मीरा को उम्मीद है कि भविष्य में वह अपनी प्रसिद्ध चचेरी बहन को कास्ट करेंगी जब वह एक बड़ी निर्माता बन जाएंगी।