बॉलिवूडसेलिब्रिटींच्या एखाद्या फोटोमध्ये जेव्हा नवीन चेहरा दिसतो, तेव्हा तो कोण आहे? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला, बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोत तिच्यासोबत एक तरुण मुलगा दिसत होता, ज्याला पाहून चाहत्यांच्या मनात तो नेमका कोण आहे, असा प्रश्न निर्माण झाला. हा तरुण एक प्रसिद्ध स्टारकिड आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी
कोण आहे तो?
तब्बूने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ज्याच्यासोबत फोटो शेअर केला आहे, तो दुसरा कोणी नसून तिचा भाचा फतेह रंधावा आहे. फतेह हा तबूची बहीण आणि अभिनेत्री फराह नाझ आणि विंदू दारा सिंह यांचा मुलगा आहे. फराह नाझ आणि विंदू दारा सिंह यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असला तरी, फतेह दोन्ही कुटुंबांशी जोडलेला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तब्बू आणि फतेह दोघे सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहेत. या फोटोतून मावशी आणि भाच्याचं खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत असून चाहत्यांनीही याला मोठी पसंती दिली आहे. फतेह रंधावा सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसला तरी, स्टार कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. त्याची आई फराह नाझ ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर वडील विंदू दारा सिंह यांनीही चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
तब्बू आणि फराह नाझ या सख्ख्या बहिणी असून त्यांच्यात खूप चांगले नाते आहे. त्यामुळेच तब्बू अनेकदा आपल्या भाच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. फराह आणि विंदू दारा सिंह यांची भेट ९० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली होती, त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, २००२ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून फराहने सुमीत सहगल यांच्याशी, तर विंदू दारा सिंह यांनी डीना उमरोवा यांच्याशी लग्न केले आहे.
Web Summary : Tabu shared a photo with her nephew, Fateh Randhawa, son of Farah Naaz and Vindu Dara Singh. Fateh, though not currently in films, is often talked about due to his family ties. The picture highlights the bond between aunt and nephew.
Web Summary : तब्बू ने अपनी भांजी, फतेह रंधावा, फराह नाज़ और विंदू दारा सिंह के बेटे के साथ एक तस्वीर साझा की। फतेह, हालांकि वर्तमान में फिल्मों में नहीं हैं, लेकिन अक्सर अपने परिवार के संबंधों के कारण चर्चा में रहते हैं। यह तस्वीर मौसी और भांजे के बीच के बंधन को उजागर करती है।