Sonnalli Seygall Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल 'प्यार का पंचनामा 2'मधून लाईमलाईटमध्ये आली. सध्या ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाली ही गर्भवती असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणचे हा तिचा शेवटचा नववा महिना सुरू आहे. सोनाली नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच केलाय. शिवाय याचे फायदेही तिने सांगितले आहेत.
सोनाली सहगलने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात पंचगव्य तुपाचा डबा दिसतोय. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे मिश्रण. यासोबत सोनालीने लिहिलं, "हे टेस्टमध्ये चांगले नाही. पण त्याचे अनेक फायदे आहेत".
यासोबत आणखी एका पोस्टमध्ये पंचगव्य तुपाचे फायदे सांगत तिने लिहलं, याचे सेवन केल्याने मानसिक व शारीरिक शक्ती चांगली राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. सोनाली सहगलने 16 ऑगस्ट रोजी तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. एका अतिशय क्यूट पोस्टद्वारे तिने सांगितले होते की ती आई होणार आहे.