Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरीनंतर सोनम कपूरने कसं कमी केलं वजन? अभिनेत्रीची कमाल Weight Loss जर्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:10 IST

अभिनयाबरोबर सोनमनं तिच्या सौंदर्यानं आणि फिटनेसनही सर्वांचं लक्ष वेधलं.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर अभिनयामुळे कायम चर्चेत असते. अभिनयाबरोबर सोनमनं तिच्या सौंदर्यानं आणि फिटनेसनही सर्वांचं लक्ष वेधलं. सोनम कपूरच्या फिटनेसचे अनेक चाहते दिवाने आहेत. पहिलं बाळ झाल्यानंतरही सोनम कपूरनं तिचा फिटनेस कायम ठेवला. बाळ झाल्यानंतरही सोनम कमालीची फिट झाली आहे. नुकतेस सोनमने डिलिव्हरीनंतर स्वत: वजन कमी कसे केले आणि कशी फिट झाली, याचा खुलासा केला आहे.

सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने आई झाल्यानंतर तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर भाष्य केलं. ती म्हणाली, 'मला पुन्हा पुर्ववत होण्यासाठी 16 महिने लागले आहेत. कोणत्याही क्रॅश डाएटशिवाय आणि क्रेझी वर्कआउट्सशिवाय मी हळूहळू स्थिरपणे स्वत: ची  आणि बाळाची काळजी घेतली. मी अजून पुर्ण फिट झाली नाहीये. पण, त्या मार्गावर आहे. पण, हा शरीरबदलाचा संपुर्ण अविश्वसनीय आहे. स्त्री असणे ही एक विलक्षण गोष्ट आहे'.

सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची फिट दिसत आहे. सोनम कपूरच्या चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक सेलिब्रिटी असूनही तिनं पोस्ट डिलिव्हरीवर भाष्य केलं, त्यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत.  एका चाहत्याने म्हटले, ' तुला फॉलो करणारी एक व्यक्ती म्हणून तुला अशा विषयावर मत मांडलेलं पाहून आनंद झाला.  याचा माझ्यासारख्या लोकांवर खोलवर परिणाम होतो'. 

सोनम कपूर ही बिझनेस आनंद आहुजाची पत्नी असून त्यांना वायू हा मुलगाही आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सोनम कपूर तिच्या मुलाचे खूप सुंदर फोटो शेअर करताना दिसते. सोनम आणि तिचा मुलगा वायू यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सोनम खूपच आलिशान आयुष्य जगते हे आपण अनेकदा पाहिलंच आहे. लंडन, दिल्लीत तिचं आलिशान घर आहे.  सोनम प्रमाणेच आनंद सुद्धा सोशल मीडियावर सक्रीय आहे.

टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी