Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा; म्हणाली - 'अभिनय रक्तात, पण व्यवसाय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 10:17 IST

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे.   सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या सोनाक्षी दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये "फरीदान' भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. सोनाक्षी ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती एक जबरदस्त बिझनेस वुमनदेखील आहे. 

सोनाक्षी ही आर्टिफिशियल नेल ब्रँड  'सोईज' (SOEZI) ची मालकिन आहे. नुकतेच सोनाक्षीनं आयएएनएसला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्री होण्यापेक्षा बिझनेस वुमन होणं थोडं कठीण आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, अभिनय माझ्या रक्तात आहे. ते मी सहज शिकले. त्यात कधीच अस्वस्थ वाटलं नाही. पण, एक उद्योजिका म्हणून हे अगदी नवीन आहे. अभिनयापेक्षा हे माझ्यासाठी थोडे कठीण आहे'.

पुढे सोनाक्षी म्हणाली, 'मी व्यवसायात बऱ्याच गोष्टी शिकत आहे आणि मला वाटते की मी त्यात चांगली कामगिरी करतेय. मी माझं उत्तम देण्याचा प्रयत्न करत असते. कारण, हे थोडं हटके असून मला खरोखर हे सर्व आवडत आहे'.  यासोबतच सोनाक्षीनं तिला गाणे ऐकायला आवडत असल्याचं सांगितलं. सोनाक्षी म्हणाली, 'मला संगीत ऐकायला खूप आवडतं. हिंदी चित्रपटातील गाण्यांपासून ते पंजाबीपर्यंत सर्व गाणे माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत. मला फक्त बीट्स असलेली इंस्ट्रुमेंटल गाणीही आवडतात. मी भरपूर पंजाबी संगीत ऐकते'.

सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयासोबतच व्यावसायत पदार्पण केलं आहे. यातून त्या मोठी कमाई करत आहेत. या यादीत अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, आलिया भट्ट, सोनम कपूर, लारा दत्ता, प्रियांका चोप्रा, मसाबा गुप्ता, सनी लिओन, लिसा हेडन, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस आणि रिया कपूर यांच्या नावांचा समावेश आहे.  कतरिना 'के ब्युटी'ची मालकीण आहे, तर आलिया कपड्यांचा ब्रँड उत्कृष्ट पद्धतीने हाताळते आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूडव्यवसाय