Shraddha Kapoor:बॉलिवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत असतात. त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलचं प्रत्येक चाहत्याला आकर्षण असतं. परंतु, बॉलिवूडमध्ये अशा काही कलाकार आहेत जे कोट्यावधींची संपत्तीचे मालक असूनही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. यापैकीच एक नाव म्हणजे श्रद्धा कपूर. काय आहे यामागे कारण, जाणून घेऊया...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही खलनायक आणि अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरने २०१० पासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ती 'आशिकी २', 'हैदर', 'एक व्हिलन', 'बागी', 'स्त्री' यांसारख्या सिनेमे तिच्या नावावर आहेत. 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००' च्या यादीत ती ५७ व्या क्रमांकावर होती.याशिवाय श्रद्धाची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री २'चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले. या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. मात्र, तुम्हाला माहितीये कोट्यवधींची मालकीण असलेली श्रद्धा भाड्याच्या घरात राहते.
एका महिन्याचं भाडं आहे तब्बल...
नुकताच श्रद्धा कपूरने मुंबईतील जुहू परिसरात भाड्याने घर घेतलं आहे. शिवा. त्याचं एका वर्षासाठी नूतनीकरण केलं आहे. ज्यासाठी ती दरमहा 6 लाख रुपये भाडे देणार आहे. प्रॉपर्टी नोंदणी दस्तऐवजांनुसार, श्रद्धाने हेच अपार्टमेंट गेल्या वर्षीही भाड्याने घेतलं होतं, त्यानंतर आता पुन्हा १२ महिन्यांचा करार तयार करण्यात आला आहे. जुहुतील अभिनेत्रीच्या या घराचं वर्षाचं एकूण भाडं सुमारे ७२ लाख रुपये आहे. शिवाय अभिनेत्रीने या नवीन करारासाठी ₹३६,००० स्टॅम्प ड्युटी आणि ₹१,००० नोंदणी शुल्क भरलं असल्याचीही माहिती मिळते आहे.
मुंबईचा जुहू परिसर तेथील लॅव्हिश लाईफ आणि आलिशान समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यांसाठी प्रसिद्ध आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि विमानतळाशी उत्तम कनेक्टिव्हिटी असल्याने, हे कलाकारांचे आवडते ठिकाण आहे. श्रद्धा कपूर व्यतिरिक्त, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, वरुण धवन आणि हृतिक रोशन सारख्या प्रमुख कलाकारांचीही येथे घरे आहेत.
Web Summary : Shraddha Kapoor, despite her wealth, rents a Juhu apartment for ₹6 lakh monthly. Renewing the lease, she paid ₹36,000 in stamp duty. Other Bollywood stars also favor Juhu for its connectivity and lavish lifestyle.
Web Summary : श्रद्धा कपूर करोड़ों की संपत्ति के बावजूद मुंबई के जुहू में किराए के घर में रहती हैं, जिसका किराया ₹6 लाख प्रति माह है। उन्होंने नवीनीकरण के लिए ₹36,000 की स्टाम्प ड्यूटी चुकाई। जुहू कलाकारों का पसंदीदा इलाका है।