Join us

धक्कादायक! अभिनेत्रीची प्रेमात झाली फसवणूक; निर्मात्याने लीक केला MMS, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 11:49 IST

अभिनेत्री म्हणाली सुरुवातील सर्वकाही ठीक चालू होतं ब्रेकअप झालं अन्...

ओदिशा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शीतल पात्रा(Sheetal Patra) ने नुकतेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते दयानिधी दहिमा यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. दयानिधी यांनी आपला छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. याशिवाय अभिनेत्रीने MMS आणि खाजगी फोटो लीक करण्यासारखे अनेक गंभीर आरोपही केले आहेत. अभिनेत्रीचे नाव यापूर्वीही या चित्रपट निर्मात्याशी जोडले गेले आहे. आता अभिनेत्रीने या नात्याची सत्यता सांगितली आहे.

MMS लीक केल्याप्रकरणी शीतल पात्रा यांनी लक्ष्मी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टनुसार, शीतलने सांगितले की, ती काही काळ निर्माता दयानिधी दहिमासोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा दयानिधी यांनी तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक केला, असं शीतलने म्हटलंय.  सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. मात्र शीतलने जसं दुसऱ्या निर्मात्यांसोबत काम करणं सुरू केलं, तेव्हा दयानिधी यांना गोष्टी खटकू लागल्याचं तिचं म्हणणं आहे. 

या वर्षी मार्च महिन्यात शीतलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत दयानिधीबद्दल खुलासा केला होता. “खोट्या बातम्या पसवरणं आणि सायबर बुलींग हा अपराध आहे.  दयानिधी दाहिमा नावाची व्यक्ती सोशल मीडियावर अशी एक एजन्सी चालवते. त्याने बरेच फेक अकाऊंट सुरू केले आहेत आणि आता कुठे त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे”, असं तिने या व्हिडीओत म्हटलं होतं.

 'काही लोकांसाठी हा विनोद असू शकतो, परंतु एका महिलेसाठी हा किती मोठा धक्का आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. मी सर्व कलाकार आणि महिलांना सांगेन की ते कामाच्या संदर्भात ज्यांना भेटतील त्यांची काळजी घ्यावी. असंही ती म्हणाली. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी