Join us

"तो अध्याय माझ्या आयुष्यातून पुसला गेलाय…", राकेश बापटसोबतच्या ब्रेकअपवर शमिता शेट्टी स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:57 IST

"तो अध्याय माझ्या आयुष्यातून पुसला गेलाय…", प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासोबतच्या ब्रेकअपवर शमिता शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली...

Shamita Shetty :बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ९० च्या दशकातील नावाजलेली अभिनेत्री आहे. हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ तिने गाजवला.आपल्या बहिणीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहीण शमितानेही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र,तिला फारसं यश मिळालं नाही. ये है मोबहब्ते चित्रपटानंतर शमिता शेट्टीला फार कमी चित्रपटांमध्ये दिसली. दरम्यान, आपल्या करिअरपेक्षा या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चा झाली. अलिकडेच ‘बिग बॉस ओटीटी’शो दरम्यान शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेता राकेश बापटच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र, त्याचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यातच आता शमिता शेट्टीने एका मुलाखतीत पहिल्यांदाच तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर भाष्य केलं आहे. 

अलिकडेच 'Pinkvila' ला  दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शमिता शेट्टीने तिच्या आणि राकेश बापटच्या  ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली.शिवाय आपल्या आयुष्यातून तो अध्याय पूसला गेला आहे असं तिने म्हटलं. त्यादरम्यान शमिता खुलासा करत म्हणाली, "तुम्ही समजून घ्या जेव्हा तुम्ही इतके दिवस घरात राहत असाल तेव्हा मला वाटतं की असे संबंध निर्माण होणं स्वाभाविक हे. कारण, त्यावेळी तुम्हाला आधाराची गरज असते. त्या क्षणी तुम्ही जवळीक शोधता, जे खूप नैसर्गिक आहे. पण याउलट आम्ही बाहेर असतो तर असं घडलं नसतं कारण आम्ही दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहोत.तो अध्याय माझ्या आयुष्यातून पुसला गेलाय." अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली.

दरम्यान, बिग बॉसच्या ओटीटी अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी दोघेही सहभागी झाले होते. त्या दरम्यान,दोघांचे सूत जुळले पण जेव्हा बिग बॉसचा शो संपला त्यानंतर काहीच महिन्यांत दोघांनी ब्रेकअप झाल्याचे जाहीर केलं होतं.

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडराकेश बापट