Join us
Daily Top 2Weekly Top 5

४७ वर्षीय 'ही' बॉलिवूड अभिनेत्री सिनेसृष्टीत दणक्यात करतेय कमबॅक; मराठी बिझनेसमनशी केलंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:59 IST

एक बॉलिवूड अभिनेत्री मधल्या काळात इंडस्ट्रीतून गायब झाली होती. आता तब्बल १०  वर्षांनी ही बॉलिवूड अभिनेत्री कमबॅक करणार आहे. या अभिनेत्रीचं खास मराठी कनेक्शन समोर आलं आहे

एक बॉलिवूड अभिनेत्री मधल्या काळात इंडस्ट्रीतून गायब झाली होती. परंतु ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. आता तब्बल १०  वर्षांनी ही बॉलिवूड अभिनेत्री कमबॅक करणार आहे. ही अभिनेत्री आहे समीरा रेड्डी.  तब्बल १० वर्षांनंतर समीरा (sameera reddy) अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत असून ती आगामी 'आखरी सवाल' (Aakhri Sawal) या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्त सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

समीरा रेड्डीने लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियावर ती तिच्या 'बॉडी पॉझिटिव्हिटी' आणि पालकत्वाशी संबंधित व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, ती पुन्हा अभिनय कधी करणार, असा प्रश्न तिचे चाहते सतत विचारत होते. आता 'आखरी सवाल'च्या निमित्ताने समीराच्या कमबॅकवर शिक्कामोर्तब बसला आहे. समीराने खऱ्या आयुष्यात मराठमोळा बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केलंय. विशेष म्हणजे समीरा आणि अक्षय यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.

'आखरी सवाल' या चित्रपटात संजय दत्त तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे, तर समीरा रेड्डी एका महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या दोघांनी यापूर्वी 'मुसाफिर' या चित्रपटात एकत्र काम केले होते. अनेक वर्षांनंतर या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल समीरा रेड्डीने आपल्या सोशल मीडियावरूनही या नव्या प्रवासाचे संकेत दिले असून, तिचे चाहते तिला पुन्हा एकदा अभिनयाकडे वळताना पाहून खूप आनंदात आहेत. हा चित्रपट २०२६ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sameera Reddy returns to Bollywood after 10 years hiatus.

Web Summary : Sameera Reddy is making a comeback after 10 years with 'Aakhri Sawal' alongside Sanjay Dutt. She married Marathi businessman Akshay Varde. The film is expected to release in 2026.
टॅग्स :समीरा रेड्डीबॉलिवूडसंजय दत्त