Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानची हिरोईन, १९ व्या वर्षीच दिलेला मुलीला जन्म; आता लेकही आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:58 IST

कोण आहे ही अभिनेत्री?

मनोरंजनविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी लहान वयातच इंडस्ट्रीत काम सुरु केलं. आज अनेकांना ओळखणंही कठीण होतं. काही कलाकार लग्न करुन संसारात रमले आणि तर काहींनी इंडस्ट्रीला कायमचा निरोप दिला. अशीच एक अभिनेत्री जी सलमान खानसोबत एकेकाळी मुख्य भूमिकेत दिसली होती. वयाच्या १९ व्या वर्षीच ती आई झाली. आज तिची लेकही अभिनेत्री आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे रुखसार रहमान. १९९१ साली सलमान खानचा 'सनम बेवफा' सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून आधी अभिनेत्री रुखसारला ऑफर होती. मात्र काही कारणाने तिला हा सिनेमा सोडावा लागला. ती एका मुलाखतीत म्हणालेली की, "मला सनम बेवफा सिनेमा करायचा होता. पण त्या सिनेमाचा एक कॉन्ट्रॅक्ट होता आणि माझ्या वडिलांना तो मान्य नव्हता. त्यांनी हा सिनेमा करु नको असं सांगितलं. तोपर्यंत मी ३-४ दिवस शूटही केलं होतं. मजेची गोष्ट म्हणजे मेकर्सने त्यातील अभिनेत्रीचं नाव रुखसारच ठेवलं. " रुखसारने सिनेमा सोडल्यानंतर अभिनेत्री चांदनीने त्यात काम केलं होतं आणि सलमानसोबत पदार्पण केलं होतं. ती रातोरात स्टार बनली होती. दरम्यान १७ वर्षानंतर 'गॉड तुस्सी ग्रेट हो'  या सलमान खानच्याच सिनेमा रुखसार रहमानला संधी मिळाली. ती सिनेमात सलमानच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. 

रुखसारने १९९० साली करिअरला सुरुवात केली होती. तिने 'याद रखेगी दुनिया','इंतेहा प्यार की' सारखे सिनेमे केले. नंतर तिने ब्रेक घेतला आणि ती थेट २००५ साली परत आली. तिने 'पीके', 'उरी', '८३' या सिनेमांमध्ये काम केलं. तसंच ती टीव्ही मालिका, वेबसीरिजमध्येही झळकली. 'कुछ तो लोग कहेंगे' ही तिची गाजलेली मालिका होती. 

रुखसार रहमानने असद अहमदसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. १९ व्या वर्षीच तिने मुलीला जन्म दिला होता. मात्र ती संसारात खूश नव्हती. तिला अनेक अडचणी येत होत्या. शेवटी ८ महिन्यांच्या लेकीला घेऊन ती पळून गेली. पतीसोबत घटस्फोट घेतला. लेकीचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी तिने एक बुटीक सुरु केलं. आज रुखसारची मुलगी आयशा अहमद ही ओटीटीवर प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan's actress, mother at 19; daughter is also an actress.

Web Summary : Rukhsar Rahman, once offered a role opposite Salman Khan, became a mother at 19. She later divorced and raised her daughter, Aisha Ahmed, who is now a successful OTT actress.
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूड