Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब असलेली रिया सेन पुन्हा आली चर्चेत, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:07 IST

बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया रियल लाइफमध्येसुद्धा तितकीच बिनधास्त आणि बोल्ड आहे

ठळक मुद्देरियाही अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे. २०१७ मध्ये रियाने बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधली.

स्टाईल, झनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी अशा सिनेमात झळकलेली रिया सेन काही काळ चर्चेत आली आणि अचानक गायब झाली. आता रिया सेनची चर्चा होतेय ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही. साहजिकच अभिनेत्री म्हणून रिया बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करू शकली नाही. तूर्तास, बोल्ड अंदाजातील फोटोशूट करून सा-यांचे लक्ष वेधून घेणे हेच तिचे काम. सध्या एका नव्या फोटोशूटमुळे रिया चर्चेत आहेत.

काही तासांपूर्वी रियाने या फोटोशूटचे बोल्ड फोटो शेअर केलेत आणि लगेच ते व्हायरल झालेत. तिच्या या फोटोंना आत्तापर्यंत 11 हजारांवर लाईक्स मिळाले आहेत.

एका फोटोत तिच्यासोबत तिची बहीण रायमा सेनही दिसतेय.

मुळात डोकं नसलेली एक अभिनेत्री रियाची प्रतिमा बॉलिवूडमध्ये निर्माण झाली होती. रियाला ती इमेज तिला बदलायची होती. त्यामुळेच तिने  बंगाली सिनेमांच्या आॅफर्स स्विकारल्या आणि काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

रियाही अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे. २०१७ मध्ये रियाने बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधली. हे एक सीक्रेट मॅरेज होते.

कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र इतकेच या लग्नाला हजर होते. हे लग्न इतक्या घाईघाईत झाले की, यानंतर रिया लग्नापूर्वी प्रेग्नंट आहे, अशी चर्चा पसरली. पण नंतर ही चर्चा अफवा निघाली. 2001 मध्ये ‘स्टाईल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात ती शर्मन जोशीसोबत दिसली होती.

टॅग्स :रिया सेन