Priyanaka Chopra: ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने अभिनयाच्या दुनियेत एक स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या अभिनयाचे रंग भरून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणाऱ्या क्वांटिको या सीरिजच्या माध्यमातून प्रियंका परदेशी प्रेक्षकांच्याही मनावर राज्य करु लागली आहे.द स्काई इज पिंक या चित्रपटानंतर अभिनेत्रीने हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. प्रियंकाचं ध्येय फक्त करिअर घडवणं इतकंच नाही, आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतील अशा भूमिका साकारायच्या आहेत, असं ती कायम सांगते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरविषयी खुलासे केले आहेत.
हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये अंजूला आचारिया यांच्यासोबत संवाद साधताना अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णयावर भाष्य केलं. प्रियांका चोप्राने सांगितलं,'ती हॉलिवूड इंडस्ट्रीत पूर्णपणे नवीन होती. हॉलिवूडमध्ये तिने सुरुवातीला छोट्या भूमिका केल्या.तिला बऱ्याचदा बराच वेळ वाट पाहावी लागत असे. इतकेच नाही तर कधीकधी ती सेटवर १५ तासही शूटिंग करावी लागत असे.या अशा गोष्टी माझ्या बॉलिवूड कारकिर्दीत कधीही अनुभवल्या नव्हत्या.मी दररोज सकाळी ते करायला तयार होते कारण मला वाटायचं, मी दीर्घकाळाचा विचार करत आहे.मला एक वारसा निर्माण करायचा आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
बॉलिवूडमधून का घेतला ब्रेक?
या मुलाखतीत प्रियंकाने तिच्या बॉलिवूडमधील स्ट्रगलविषयी म्हणाली,"भारतात असतानाही मला काम करताना काही अडचणी येत होत्या. मला उदरनिर्वाहासाठी काम करणं गरजेचं होतंच. त्यानंतर मी हॉलिवूडकडे लक्ष केंद्रित केलं. एका मॅगझीनमध्ये आपला फोटो झळकावा, असं मलाही वाटायचं. त्यासाठी रोज सकाळी उठून कामावर जा.... जे काही छोटे मोठे रोल्स मिळतील ते करा. एखाद्या ट्रेलरमध्ये मी दिसले तरी त्यातही तीन-चार कलाकार असायचे. असा हा प्रवास होता."
याशिवाय, प्रियंकासाठी यशाची व्याख्या म्हणजे काय? याबद्दल ती म्हणाली, तिच्यासाठी खरं यश म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणं आहे. मुलीला शाळेत घेऊन जाणं आणि शाळेतून आणणं. अभिनेत्रीला अशा प्रकारचे काम करायचे होते, हे आपल्यासाठी यशापेक्षा कमी नाही अशा भावना देखील प्रियंकाने यावेळी व्यक्त केल्या.
Web Summary : Priyanka Chopra discussed her Hollywood journey, facing long hours and small roles initially, unlike her Bollywood experience. She prioritized legacy over instant fame, also citing difficulties in Bollywood as reason for her break. She values family time as true success.
Web Summary : प्रियंका चोपड़ा ने अपने हॉलीवुड के सफर पर बात की, जहाँ उन्हें शुरुआत में लंबे समय तक काम करना पड़ा और छोटी भूमिकाएँ मिलीं, जो उनके बॉलीवुड अनुभव से अलग था। उन्होंने तत्काल प्रसिद्धि के बजाय विरासत को प्राथमिकता दी, और बॉलीवुड में कठिनाइयों को भी अपने ब्रेक का कारण बताया। वह पारिवारिक समय को सच्ची सफलता मानती हैं।