अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
By कुणाल गवाणकर | Updated: September 19, 2020 23:16 IST
अनुराग कश्यपला अटक करा; अभिनेत्री कंगना राणौतची मागणी
अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
मुंबई: अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पायलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्यपवर गंभीर आरोप केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेला धोका असल्याचं पायलनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. पायलच्या आरोपावर अद्याप तरी कश्यपनं प्रतिक्रिया दिलेली नाही.अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...पायल घोषनं ट्विट करून कश्यपवर गंभीर आरोप केले. 'अनुराग कश्यपनं अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर जबरदस्ती केली. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तीमागील राक्षस देशाला पाहू दे. यामुळे माझं नुकसान होऊ शकतं, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे. कृपया मदत करा,' असं आवाहन पायलनं केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, अमली पदार्थांच्या वापरावर सातत्यानं बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं पल्लवी घोषचं ट्विट रिट्विट केलं आहे. प्रत्येकानं उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक व्हायला हवी, असं कंगनानं म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पायलच्या ट्विटची दखल घेतली आहे. पायलनं राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असं शर्मांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल