Join us

'२०२४ मी तुझा तिरस्कार नाही करत पण..'; अभिनेत्री मलायका अरोराची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:58 IST

मलायका अरोराने २०२४ ला निरोप देताना शेअर केलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे (malaika arora)

आज २०२४ चा शेवटचा दिवस. २०२४ ला निरोप देण्यासाठी जगभरातले नागरीक सज्ज आहेत. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटीही २०२४ ला आनंदाने निरोप देऊन २०२५ अर्थात नवीन वर्षाचं स्वागत करण्यास सज्ज आहेत. अशातच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना मलायका अरोराने तिच्या सोशल मीडियावर २०२४ ला निरोप देतानाची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. काय लिहिलंय मलायकाने बघा.

मलायका अरोराची पोस्ट चर्चेत

मलायकाने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहून म्हटलंय की, "२०२४ वर्ष. मी तुझा तिरस्कार नाही करत पण हे वर्ष खूप कठीण गेलं. खूप आव्हानं आली, खूप बदल झाले आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आयुष्य कसं बदलतं हे तू मला दाखवून दिलंस. डोळ्यांची पापणी लवताच आयुष्यात अनेक बदल घडतात. मला वाटतं, मला स्वतःवर आणखी विश्वास ठेवला पाहिजे. माझं मानसिक,  शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य किती  गरजेचं आहे हे तू मला दाखवून दिलंस."

"मला वाटतं या काळात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला आणखी समजाव्या लागतील. पण मला वाटतं की, येणाऱ्या काळानुसार काही गोष्टी आपसूक कळत जातील. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, हे मला समजलंय." अशाप्रकारे मलायका अरोराने २०२४ ला निरोप देताना खास पोस्ट शेअर केलीय. २०२४ मध्ये मलायकाच्या वडिलांचं निधन झालं. तिचं अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झालं. 

 

टॅग्स :मलायका अरोरामलायका अरोराइयर एंडर 2024