Join us

अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, वेबसीरिजच्या नावाखाली अश्लिल व्हिडीओचे शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 12:31 IST

गहनावर 85 पेक्षा जास्त पॉर्न व्हिडीओ बनवून ते मोबाईल अ‍ॅप्सवर डाऊनलोड केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देगहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून गहना वशिष्ठ केले.

पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेटचा पर्दाफाश करत, मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वाशिष्ठला अटक केली आहे. गहनावर 85 पेक्षा जास्त पॉर्न व्हिडीओ बनवून ते मोबाईल अ‍ॅप्सवर डाऊनलोड केल्याचा आरोप आहे. याआधीही गहना अश्लिल चित्रपट बनवल्यामुळे चर्चेत होती.

 काही दिवसांच्या मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी अश्लिल सिनेमांचे शूटींग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.   पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता  गहना वशिष्ठचे समोर आले.  गहना तिच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली अश्लिल व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा आरोप आहे. 

गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून गहना वशिष्ठ केले. तिचे मित्र तिला जिंदगी नावानेही ओळखतात. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि ती मॉडेलिंगकडे वळली.

तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.

22 नोव्हेंबर 2019 रोजी एका वेबसीरिजचे शूटींग करताना तिला अचानक हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अनेक दिवस रूग्णालयात राहिल्यानंतर तिने पुन्हा वापसी केली होती.

टॅग्स :बॉलिवूड