Join us

डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर झाले गंभीर परिणाम, म्हणाली- "६ दिवस मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:14 IST

'शांती' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अश्विनी काळसेकर ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ashwini Kalsekar: 'शांती' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अश्विनी काळसेकर (Ashwini Kalsekar) ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री अश्विनी कळसेकर हिने मराठीसह हिंदी सृष्टीही गाजवली आहे. अश्विनी कळसेकर यांनी जोधा अकबर, जॉनी गद्दार, कसम से, गोलमाल अगेन अशा अनेक कलाकृतीतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. अभिनेत्री खलनायिका ते विनोदी भूमिका अगदी लीलया पेलणाऱ्या अश्विनीचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री तिच्या आजारपणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. 

नुकतीच अश्विनी काळसेकर यांनी सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब'ला मध्ये मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्रीने आरोग्यविषयक समस्यांबदल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, "मला डाव्या बाजूला किडणीच नाही आहे. हे मला लहानपणापासूनच माहीत होतं. त्याने काही फरक पडला नाही. पण तरीही मला लहानपणी मुलांसारख्या बाईक चालवायला आवडायच्या. २००७ साली डॉक्टरांनी माझ्यावर चुकीची लेझर प्रोसेस केली गेली, मला इन्फेक्शन असताना. तेव्हा २४ तासात ते इन्फेक्शन सर्व शरीरभर पसरलं. तेव्हा 'नमस्कार यमराजा' असं मी म्हणून आले होते. डॉक्टरांनी सुद्धा सगळी आशा सोडून दिली होती."

त्यानंतर अश्विनी काळसेकर म्हणाली, "आमच्याकडे इतका वेळही नव्हता की त्या वेळात दुसरी किडणी ट्रान्सप्लांट करता येईल. ६ दिवस मी जागी होते आणि असंबंध बडबडत होते. अनेक उपाय केल्यानंतर मला दुसरं आयुष्य मिळालं. अनेक दिवस सकाळी, रात्री अशी रोज २ इंजेक्शन घ्यावी लागायची त्याच्या गाठी तयार झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये उठून मी सेटवर जायचे तेव्हा एकता कपूर, कलाकारांनी खूप सांभाळून घेतलं. त्यावेळेला खूप सीन असे बसून केले. त्यादरम्यान माझं वजन वाढू लागलं. या किडणीच्या आजारामुळे मी बाळाचाही विचार करू शकत नाही. त्यामुळे घरात दोन श्वान आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवते. यामध्ये माझ्या कुटुंबीयांची खूप साथ मिळाली." असा खुलासा तिने केला. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी