Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 09:41 IST

आलिया भटने स्वतःचं पुस्तक लॉंच केलं असून मुंबईत त्याचा ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला होता (alia bhat)

आलिया भट ही सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलियाने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये टॉपची हिरोईन म्हणून नाव कमावलंय. आलियाने निर्माती म्हणून काही कलाकृतींच्या प्रॉडक्शनची जबाबदारीही सांभाळली आहे. उत्तमोत्तम कलाकृतींमधून अभिनयाचं शिखर गाठणाऱ्या आलियाने आता साहित्यविश्वात पाऊल ठेवलंय. आलियाने स्वतःचं पुस्तक लॉंच केलंय. या पुस्तकाचं नाव आहे 'एड फाइंड्स अ होम'.

आलियाच्या नवीन पुस्तकाचा विषय काय?

आलियाने पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तिच्या नवीन पुस्तकाविषयी सांगितलं. आलिया म्हणाली, "पुस्तकाचा मुख्य नायक आहे एड. याशिवाय पुस्तकात आलिया नावाची छोटी मुलगी. पण प्रत्यक्षात तिचे नाव मामा आहे. या पुस्तकाचा विषय एड नावाचा कुत्रा आणि आलिया या दोघांभोवती फिरतो. आलियाकडे महाशक्ती आहे आणि ती एडशी बोलू शकते." अशाप्रकारे विशेषतः लहान मुलांसाठी चित्ररुपात आलियाने हे पुस्तक समोर आणलंय. 

आलिया भटचं वर्कफ्रंट

आलियाने स्वतः लिहिलेलं हे खास पुस्तक लॉंच करुन साहित्यविश्वातही स्वतःची छाप सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आलियाने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात अभिनय करुन आणखी एक सुपरहिट सिनेमा दिला. आलिया लवकरच 'जिगरा' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात आलिया पत्रकाराच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आलिया भटमुंबईबॉलिवूड