Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आता मी शांत बसणार नाही'; अथियाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 17:03 IST

Suniel shetty: गेल्या काही दिवसांपासून सुनील शेट्टी त्याच्या लेकीमुळे म्हणजेच अथिया शेट्टीमुळे चर्चेत येत आहे.

आपल्या दमदार अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniel shetty). गेल्या काही दिवसांपासून सुनील शेट्टी त्याच्या लेकीमुळे म्हणजेच अथिया शेट्टीमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अथियाला ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच सोशल मीडियामुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्धवस्त होतं यावरही भाष्य केलं आहे.

अलिकडेच सुनील शेट्टीने 'द रणबीर' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आजच्या काळात सोशल मीडियाची वाढती क्रेझ आणि प्रभाव यावर भाष्य केलं.

‘'सोशल मीडियामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू होऊ शकतं. त्यामुळे काही वेळा मला कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायची भीती वाटते.  सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात प्रायव्हसी शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुम्ही केलेलं एखाद्य वक्तव्य १५ वेळा वेगवेगळ्या प्रकारे एडिट केलं जातं. त्या प्रत्येक वाक्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यामुळे मला मोकळेपणाने बोलायचीही भीती वाटते", असं सुनील शेट्टी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यापूर्वी तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता. कारण, ज्या गोष्टी आम्ही केल्याच नाही त्यावरुन सतत आम्हाला टीका सहन करावी लागते. आणि, हे टीका करणारे लोक कोण असतात ज्यांना आम्ही ओळखत पण नाही. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करणारे, माझ्या मुलीला अथियाला शिवीगाळ करणे. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. कारण मी जुन्या विचारांचा आहे. पण, म्हणून मी शांतही बसणार नाही.मी शेट्टींचा मुलगा आहे हे तुम्हाला माहितीये. मी कधीच शांत बसणार नाही." 

टॅग्स :सुनील शेट्टीअथिया शेट्टी बॉलिवूडसेलिब्रिटी