दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित प्रोजेक्ट 'रामायण' चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या कास्टिंगबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच आता सुग्रीवाच्या भूमिकेसाठी एका लोकप्रिय अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. 'शर्माजी नमकीन' आणि 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता सुहैल नायर आता या पौराणिक महाकाव्यात सुग्रीवाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहैल नायरने या भूमिकेची ऑफर स्वीकारली असून त्याने आपल्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. सीता मातेच्या शोधात आणि रावणाविरुद्धच्या युद्धात श्रीरामांना सुग्रीवाने मोलाची साथ दिली होती, हे आपल्याला माहितच आहे. सुहैल नायर ही आव्हानात्मक भूमिकेत कशी साकारणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी 'पंचायत' फेम अभिनेता फैसल मलिक याला कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी निवडल्याची चर्चा होती, त्यानंतर सुहैलची एन्ट्री ही या चित्रपटासाठी दुसरी मोठी कास्टिंग अपडेट मानली जात आहे.
हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असणार असून, निर्मात्यांनी यासाठी सुमारे ४००० कोटी रुपयांचे बजेट निश्चित केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त सनी देओल हनुमानाची तर लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
हा भव्य चित्रपट दोन भागात प्रदर्शित करण्याची योजना असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरा भाग पुढील वर्षीच्या दिवाळीत अर्थात २०२७ ला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन आणि व्हीएफएक्सवर (VFX) मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीतकार आणि तंत्रज्ञ या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
Web Summary : Suhail Nayyar joins Nitesh Tiwari's 'Ramayana' as Sugriva, starring Ranbir Kapoor as Rama. The epic, budgeted at ₹4000 crore, will release in two parts, starting Diwali 2026.
Web Summary : नितेश तिवारी की 'रामायण' में सुहैल नय्यर सुग्रीव की भूमिका निभाएंगे, रणबीर कपूर राम बनेंगे। 4000 करोड़ के बजट वाली यह फिल्म दो भागों में, दिवाली 2026 से रिलीज होगी।