Join us

शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:19 IST

काही वर्षांपूर्वी बलात्काराच्या आरोपात अडकलेला अभिनेता, आता झाला ५० वर्षांचा; बघा फोटो

'भुलभूलैया'मध्ये विद्या बालनच्या अपोझिट दिसलेला अभिनेता शायनी आहुजा आठवतोय? 'गँगस्टर' सिनेमातही तो कंगना राणौतसोबत दिसला होता. २००९ साली शायनीवर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला. ती महिला शायनीच्या घरात काम करणारी होती. या आरोपांमुळे शायनीचं करिअर उद्धवस्त झालं.  आता शायनी आहुजा नक्की कुठे आहे आणि काय करतो?

शायनी आहुजा बऱ्याच वर्षांपासून स्क्रीनवरुन गायब आहे. २०११ साली बलात्काराच्या केसमध्ये मुंबईतील फास्टट्रॅक कोर्टाने शायनीला दोषी सुनावलं आणि ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा दिली.  त्याने लगेच उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्याला जामीन मिळाला. नंतर त्याने इंडस्ट्रीत कमबॅक केलं. अनीस बज्मींच्या 'वेलकम बॅक'मध्ये तो दिसला. मात्र त्याच्या करिअरमध्ये फारसा याचा फायदा झाला नाही. २०२३ साली उच्च न्यायालयाने शायनीला १० वर्षांच्या अवधीसाठी पासपोर्ट रिन्यू करण्याची परवानही दिली.

 दरम्यान सोशल मीडियावर आता एक पोस्ट व्हायरल होत आहे. शायनी आहुजा अमेरिकेत सेटल झाला असून सध्या तो फिलीपाइंसमध्ये आहे. तिथे त्याने कपड्यांचा बिझनेस सुरु केला असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर एका अकाऊंटवर शायनीचा लेटेस्ट फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तो आता ५० वर्षांचा असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

शायनी आहुजाने २००६ साली 'हजारो ख्वाहिशे ऐसी' सिनेमातून पदार्पण केलं. त्याला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला होता. नंतर तो 'गँगस्टर', 'वो लम्हे', 'भूल भुलैया', 'लाईफ इन अ मेट्रो' आणि 'वेलकम बॅक' या सिनेमांमध्ये दिसला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Where is Shiney Ahuja? Actor's viral photo makes him unrecognizable.

Web Summary : Shiney Ahuja, remembered from 'Bhool Bhulaiyaa,' faced career downfall after a 2009 rape allegation. He was convicted in 2011 but later granted bail. Reportedly settled in America, he now runs a clothing business in the Philippines. A recent viral photo shows a changed, almost unrecognizable Ahuja.
टॅग्स :शायनी अहुजाबॉलिवूडसेलिब्रिटी