Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अभिनय करु नको त्यापेक्षा...", ऐश्वर्या रायला संजय दत्तने दिलेला खास सल्ला; 'हे' होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:15 IST

'ब्यूटी क्वीन' ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.

Aishwarya Rai And Sanjay Dutt : 'ब्यूटी क्वीन' ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. तिच्या आवरच्या फिल्मी कारकिर्दीत अभिनेत्रीने बऱ्याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असते. अनेकदा तिच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे तर तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेत्री चर्चेत असते. खरंतर, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. याशिवाय 'मिस वर्ल्ड' चा किताब देखील तिने जिंकला आहे. परंतु ऐश्वर्याने अभिनयाची वाटेवर येण्यापूर्वी अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt)तिला एक सल्ला दिला होता. त्याबद्दल या दोघांनीही बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि संजय दत्त यांची पहिली भेट एका मॅगझीनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या अभिनेत्री नव्हती तर ती मॉडेलिंग करायची. त्या फोटोशूट वेळी तिला पहिल्यांदा पाहून संजय दत्तने तिच्या सौंदर्यांचं कौतुक केलं होतं. एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने तिच्या त्यांच्या भेटीचा तो किस्सा शेअर केला होता. त्यादरम्यान अभिनेता ऐश्वर्याला पाहून म्हणाला की,ही सुंदर मुलगी कोण आहे? शिवाय अभिनेत्रीला भेटल्यानंतर संजय दत्तने ऐश्वर्याला अभिनय क्षेत्रात न येण्याचा सल्ला दिला होता. तसेच आपल्या मॉडेलिंग करिअरकडे लक्ष द्यावं. फिल्म इंडस्ट्रीपासून तिने लांब राहिलेलं बरं, असा सल्ला अभिनेत्याने तिला दिला. 

त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं होतं की,"ही ग्लॅमरस दुनिया तुम्हाला स्वत: मध्ये बदल करण्यास भाग पाडते. त्याबरोबर या इंडस्ट्रीत आल्यानंतर माणसातील निरागसपणा हरवून जातो. कारण फिल्मी जगतात आल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टींचा हॅंडल कराव्या लागतील, जे सोपं काम नाही आहे." असं संजय दत्तने तिला सांगितलं होतं. 

मीडियारिपोर्टनुसार, ऐश्वर्याने संजय दत्तचं म्हणणं समजून घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या पण तिने त्या रिजेक्ट केल्या. कारण, जोपर्यंत आपल्याला चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही तोवर आपण ऑफर स्विकारायच्या नाही, असं तिने ठरवलं होतं. याचा खुलासा ऐश्वर्याने एका मुलाखतीत केला होता. 

टॅग्स :संजय दत्तऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी