Join us

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईची सुनेविरोधात पोलिसात तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:18 IST

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी झैनब उर्फ आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे....

Nawazuddin Siddiqui's mother Mehrunisa Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी झैनब उर्फ आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोनेक वर्षांपूर्वी झैनबने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. झैनबने नवाजुद्दीनवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. शिवाय नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्दीकी याच्यावरही मारहाण केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांची चांगलीच चर्चा झाली होती. आता नवाजुद्दीनची आई मेहरून्निसा सिद्दीकी यांनी सून झैनबविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.  नवाझुद्दीनच्या आईनं मेहरुन्निसा सिद्धिकी यांनी आपली सून झैनबविरोधात पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सासूच्या तक्रारीनंतर आता वर्सोवा पोलिसांनी नवाझुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून नवाझुद्दीच्या घरातमध्ये वाद सुरू आहे. नवाजुद्दीन, नवाजुद्दीनची आई आणि आलिया यांच्यात संपत्तीचा वाद आहे. त्याच वादातून ही तक्रार केली गेली असू शकते असं म्हटलं जातंय.

याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये कलम ४५२, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झैनब ही नवाझुद्दीनची दुसरी पत्नी आहे. २०१० मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत.

नवाजच्या पर्सनल लाईफमध्ये वाद सुरू असले तरी प्रोफेशनल लाईफमध्ये तो एक मोठा स्टार आहे. लवकरच तो हड्डी या सिनेमात झळकणार आहे. यात नवाज तृतीयपंथियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड