Join us

Vivaan Shah : ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री होणार नसीरूद्दीन शाह यांची सून? नाव ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 10:24 IST

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण तूर्तास बातमी नसीर यांच्याबद्दल नाही तर त्यांचा मुलगा विवान शाहबद्दल (Vivaan Shah) आहे.

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण तूर्तास बातमी नसीर यांच्याबद्दल नाही तर त्यांचा मुलगा विवान शाहबद्दल (Vivaan Shah) आहे. होय, विवानच्या लव्हलाईफची सध्या जोरदार चर्चा आहे. विवान सध्या अभिनेत्री करिश्मा शर्माला (Karishma Sharma) डेट करतोय. गेल्या वर्षभरापासून दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय.

हिंदुस्तान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवान व करिश्मा यांची भेट झाली होती. लगेच दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यावर्षाच्या सुरूवातीला दोघांनीही रिलेशनशिपमधून एक मोठा ब्रेक घेतला होता. पण आता त्यांचं नातं आधीपेक्षा अधिक चांगलं झाल्याचं कळतंय.

दरम्यान विवानने याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. करिश्माला याबद्दल विचारलं असता ती लाजताना दिसली. गेल्यावर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, तेव्हा विवान व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने मला सोबत दिली. त्याचं कुटुंब माझं कुटुंब आहे, असं ती म्हणाली. विवान खूपच प्रेमळ आहे. तो माझा खूप चांगला मित्र आहे. माझ्यासाठी देवानं दिलेला आशीर्वाद आहे. माझ्या आईलाही तो आवडतो,असंही ती म्हणाली.

विवान शाह हा नसीरूद्दीन शाह व रत्ना पाठक यांचा मुलगा आहे. ‘7 खून माफ’ या चित्रपटापासून विवानने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ‘हॅपी न्यू ईअर’ या चित्रपटात तो झळकला होता. ‘हॅपी न्यू ईअर’नंतर विवान ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याशिवाय लाली की शादी में लड्डू,दीवाना, जंक द कॉइन सारख्या चित्रपटांमधूनही त्याने  अभिनय केला. अर्थात त्याचे हे सर्व चित्रपट फ्लॉप गेलेत.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहकरिश्मा शर्माबॉलिवूडसेलिब्रिटी