Join us

सुपरहिट सिनेमे गाजवले पण ५ वर्षांपासून एकही ऑफर नाही! मोहनिश बेहेलने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:03 IST

प्रसिद्ध अभिनेत्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. पण गेल्या ५ वर्षांपासून आहे गायब. सिनेमे का मिळत नाहीत याचं कारणही सांगितलं (mohnish bahl)

'हम साथ साथ है', 'हम आपके है कौन हे' सुपरहिट सिनेमे आजही टीव्हीवर लागले की हमखास पाहिले जातात. फॅमिली ड्रामा एंटरटेनर असलेले हे सिनेमे प्रेक्षकांच्या आवडीचे सिनेमे. या दोन्ही सिनेमांमध्ये एका अभिनेत्याने काम केलं होतं. त्याचं नाव मोहनिश बेहेल. मोहनिशने बॉलिवूज गाजवलं पण तो अचानक गायब झालाय. गेल्या ५ वर्षांपासून मोहनिश कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसला नाहीय. अभिनेत्यानेच मनातली खंत व्यक्त करुन यामागचं कारण सांगितलं.

मोहनिश बेहेलला काम मिळत नाही कारण...

मोहनिश बेहेलने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की, "माझं सिनेमांमध्ये यशस्वी करिअर होतं. पुढे मी माझा मोर्चा मालिकांकडे वळवला. 'दिल मिल गए' सारख्या लोकप्रिय मालिका मी केल्या. परंतु नंतर अचानक मला सिनेमांच्या ऑफर येणं बंद झालं. मी मालिकेत काम करतोय म्हणजे माझ्या तारखांचा प्रॉब्लेम होईल. मला सिनेमांच्या शूटींगसाठी वेळ देता येणार नाही, असा अनेकांचा समज झाला. त्यामुळे मला सिनेमांच्या ऑफर येणं बंद झालं."

मोहनिश बेहेल सध्या पैसे कसे कमावतात?

मोहनिश यांनी या मुलाखतीत पुढे सांगितलं की, "माझ्या कुटुंबाची अनेक प्रॉपर्टी आणि व्यवसाय आहेत. मी ते सांभाळण्यामध्ये सध्या व्यस्त आहे." असं मोहनिश म्हणाला. मोहनिश बेहेल २०१९ मध्ये शेवटी आपल्याला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानीपत' या सिनेमात दिसलेला. ५ वर्षांपासून मोहनिश कोणत्याही नवीन सिनेमा अथवा मालिकेत दिसला नाही. मोहनिशचे चाहते त्याला पुन्हा एकदा सिनेमांमध्ये पाहायला आतुर असतील यात शंका नाही.

टॅग्स :मोहनिश बहलबॉलिवूड