Join us

3 Idiots फेम अखिल मिश्रांच्या निधनानंतर पत्नी धक्क्यात, म्हणाली, "माझा जीवनसाथी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:58 IST

अखिल मिश्रा यांची पत्नी जर्मनची असून तीही अभिनेत्री आहे.

सुपरहिट सिनेमा '3 इडियट्स' (3 Idiots) मधील सर्वच पात्र लक्षात राहण्यासारखीच आहेत.  रँचो, राजू, फरहान, व्हायरल, चतुर, मिलीमीटर ही नावं ऐकली तरी हसायला येईल इतका सर्वांनी उत्तम अभिनय केला. सिनेमातील मुख्य कलाकारांशिवाय छोट्या भूमिकाही खूप गाजल्या. त्यातलंच एक पात्र म्हणजे लायब्रेरियन दुबे. 'सर बोल वो रहा है पर शब्द मेरे है...' असं व्हायरसच्या कानात सांगणारे दुबे डोळ्यासमोर येतात. मात्र आज ते दुबे आपल्याला सोडून गेलेत. सिनेमात लायब्रेरियन दुबेंची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचं निधन झालं आहे. घरीच काम करताना झालेल्या एका अपघातात त्यांचा जीव  गेला. मिश्रा यांची पत्नी सुजैन हैदराबादमध्ये होती तेव्हा ही घटना घडली.

मीरा रोड येथील घरात अखिल मिश्रा आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांची पत्नी सुजैन बर्नर्ट जर्मन अभिनेत्री आहे. घटना घडली तेव्हा ती कामानिमित्त  हैदराबादमध्ये होती. पतीच्या निधनाची बातमी ऐकताच धक्का बसला आणि ती तातडीने मुंबईला परत आली. अखिल मिश्रा यांचं पार्थिव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. तर त्यांची पत्नी धक्क्यात आहे. एकाच वाक्यात ती प्रतिक्रिया देत म्हणाली,'माझं हृदय तुटलं, माझा जीवनसाथी आज निघून गेला.'

अखिल मिश्रा यांनी ३ फेब्रुवारी २००९ रोजी जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्टशी लग्न केले. तर ३० सप्टेंबर २०११ रोजी त्यांनी पारंपारिक सोहळा करत विवाह केला. २०१९ मध्ये आलेल्या 'मजनू की ज्युलिएट' या शॉर्टफिल्मसाठी काम केले. यामध्ये अखिल मिश्रा यांनी केवळ अभिनयच केला नाही तर दिग्दर्शनही केले. त्यांची पत्नी सुजैन अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. कसौटी जिंदगी की, सावधान इंडिया, एक हजारो मे मेरी बहना है, अशोक सम्राट, ये रिश्ता क्या कहलाता है आणि पोरस या शोजचा भाग राहिली आहे. 

अखिल मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्याय उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम सारख्या मालिकांमध्ये काम केले. तर 'डॉन','गांधी','माय फादर','कमला','वेल डन अब्बा' सारख्या सिनेमांमध्ये काम केले. '३ इडियट्स'मध्ये त्यांना कायम लक्षात राहण्यासारखी भूमिका मिळाली. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू