Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या १४ व्या वर्षी 'सिंघम'ला जडलेलं दारुचं व्यसन, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:05 IST

Ajay devgan:

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणजे अजय देवगण (ajay devgan). उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे तो सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतो. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याची एक मुलाखत चर्चिली जात आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या दारुच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे.

अजयने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्याला दारुचं व्यसन जडलं होतं असा खुलासा केला. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजयने जाहीरपणे ही कबुली दिली.

''मी प्रमाणिकपणे सांगतो, मी जे करतो ते कधीच लपवत नाही. मी पूर्वी प्रचंड दारू प्यायचो. मी एका ठराविक वेळेनंतर अशा वळणावर पोहोचलो ज्याठिकाणी मी लोकांना सांगू शकतो की, जे लोक दारु पित नाहीत त्यांच्यासाठी दारु अजिबात नाही. पण, जे अत्यंत अल्प प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्यासाठी ती ठीक आहे.  मला दारु सोडण्यासाठी वेलनेस स्पामध्ये जावं लागलं. मी दारु सोडवण्यासाठी वेलनेस स्पामध्ये जाण्याचा निर्णय घेतला'', असं अजय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''त्यावेळी मी माल्ट जराही प्यायचो नाही. पण, आता मी ते पितो. माझ्यासाठी ते मद्यपानासारखं नाही.पण, थकवा दूर करण्यासाठी, स्वत: ला शांत करण्यासाठी तु्म्ही त्याचं सेवन करु शकता. तुम्ही जेवणाबरोबर ३० ते ६० मिली त्याचं सेवन करु शकता. पण, मी खरंच ही मर्यादा पार केलेली नाही. ''

दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये कमी वयात मी दारुच्या आहारी गेलो होतो, अशी कबुली स्वत: अजयने दिली होती. '' वयाच्या १४ व्या वर्षी मित्रांच्या दबावामुळे मी दारु प्यायला सुरुवात केली होती. "माझी एक अडचण असते. मी कितीही प्यायलो तरी मला नशा चढत नाही. पण, हीच गोष्ट पुढे सवयीचा भाग होते. आणि, मग ती सोडणं कठीण होतं." असा खुलासा अजयने केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajay Devgn reveals addiction to alcohol at age 14

Web Summary : Ajay Devgn confessed to starting drinking at 14 due to peer pressure. He admitted to heavy drinking and sought wellness spa treatment to quit. Now, he consumes small amounts of malt for relaxation, staying within limits.
टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामुलाखत