Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या हाताचा फोटो व्हायरल, हातावर लिहिलं होतं - मृत्यू भेदभाव करत नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 16:41 IST

सुशांतच्या आठवणी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलिकडेच 'केदारनाथ' सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने सुशांतचा एक किस्सा शेअर केलाय.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता ६ महिने पूर्ण होतील. त्याच्या चाहत्यांना तर अजूनही यावर विश्वास बसत नाहीये की, तो आता या जगात नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सना सतत त्याची आठवण येत राहते. ते सुशांतच्या आठवणी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलिकडेच 'केदारनाथ' सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने सुशांतचा एक किस्सा शेअर केलाय.

अभिषेक कपूरने 'केदारनाथ' सिनेमाला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सुशांतच्या हाताचा एक फोटो पोस्ट केला. सोबतच लिहिले की, 'मला आठवतं जेव्हा मी त्याला स्टोरी ऐकवत होतो आणि आम्ही मंसूरबाबत डिस्कस करत होतो. त्यावेळी तो हातावर काही लिहित होतो. मी त्याला विचारलं की, तू हे काय लिहितोय? तर तो म्हणाला की, माझं विश्व जमा करतोय. सुशांतच्या फॅन्समध्ये त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या हातावर अनेक शब्द लिहिले आहेत जसे की, धर्म, वाद, वादा, ईश्वर आणि जीवन भेदभाव करत नाही यात जीवनाला त्याने काट मारलाय. मृत्यू भेदभाव करत नाही.

दुसरीकडे सुशांतचा दाजी विशाल कीर्तिनेही २ वर्ष जुनं त्यांचं चॅट शेअर केलं होतं. स्क्रीनशॉटसोबत त्याने लिहिलं होतं की, अजूनही विश्वास बसत नाही की तो नाही. यात चॅटमध्ये सुशांतने लिहिले होते की, तो लवकरच त्याच्या दाजींना भेटायला जाणार. सुशांतचा मृत्यू १४ जून २०२० ला झाला होता. पण अजूनही सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूडसोशल व्हायरल