Join us

"ऐतिहासिक सोहळ्यासाठी उत्सुक" अभिषेक बच्चनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मंदिर कसं दिसतं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:43 IST

या क्षणाचा याचि देही याचि डोळा अनुभव घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत.

Abhishek Bachchan on Ram Mandir: २ जानेवारी हा संपूर्ण देशवासियांसाठी महत्वाचा दिवस आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येत श्रीरामाची मूर्ती स्थापन होणार आहे. २२ जानेवारीला भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साधूसंत, महंतांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या क्षणाचा याचि देही याचि डोळा अनुभव घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला ज्युनिअर बच्चन?

अभिषेक बच्चनने नुकतीच आपल्या कुटुंबासह राजस्थान येथे कबड्डी टुर्नामेंटला हजेरी लावली. स्वत:ची टीम जयपूर पिंक पँथर्सला पाठिंबा देण्यासाठी तो आला होता. यानंतर माध्यमांना संबोधित करताना त्याने राम मंदिर उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला,'मी तो क्षण अनुभवण्यासाठी खूप आतुर आहे. मंदिर बनल्यावर कसं दिसतं हे मला पाहायचं आहे आणि प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.'

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आहे. संजय दत्तलाही अयोध्येला जाणार का असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, 'का नाही? नक्कीच जाणार'. याशिवाय अक्षय कुमार, अनुपम खेर, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, हरिहरन, रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन आणि रणदीप हुडासह अनेक सेलिब्रिटींना अयोध्येचं आमंत्रण मिळालं आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनराम मंदिरअयोध्याबॉलिवूड