Join us
Daily Top 2Weekly Top 5

बच्चन कुटुंबाने घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन, ऐश्वर्याच्या गैरहजेरीने पुन्हा चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 11:06 IST

यावेळी अमिताभ बच्चन तसंच त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र दिसले नाहीत.

गेल्या काही दिवसात अनेक बॉलिवूड कलाकारांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथचे दर्शन घेतले. रणवीर सिंह, क्रिती सेनन, दिशा पाटनी यांच्या दर्शनाचे, गंगा आरतीचे फोटो व्हायरल झाले होते. कालच बच्चन कुटुंबही काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचलं. अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) आई जया (Jaya Bachchan) आणि बहीण श्वेतासह (Shweta Nanda) दर्शन घेतलं. यावेळी अमिताभ बच्चन तसंच त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र दिसले नाहीत.

जया बच्चन यांनी दोन्ही मुलांसह काल काशी विश्वनाथचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर श्वेता नंदा लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसली. अभिषेक बच्चनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेट घातलं होतं. त्यांनी मंदिरात दर्शन आणि पूजनही केलं. तिघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यांच्यासोबत वाराणसीचे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रमौली उपाध्याय होते.

बच्चन कुटुंबाचे फोटो पाहून अनेकांनी ऐश्वर्या आणि आराध्या कुठे आहेत असं विचारलं. अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सध्या काही आलबेल नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अद्याप बच्चन कुटुंबाने यावर भाष्य केलेलं नाही. आता ऐश्वर्याच्या गैरहजेरीने या चर्चांना पुन्हा पेव फुटला आहे. 

अभिषेक बच्चन त्याची आई जया बच्चन यांच्या फार जवळ आहे. आईचं ऐकही वाक्य तो खाली पाडू देत नाही. मात्र आता सासू-सूनेतच खटके उडाल्याने अभिषेकची तारांबळ पंचाईत झाल्याचं दिसतंय. शिवाय ऐश्वर्या चं नणंद श्वेताशीही पटत नसल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनजया बच्चनवाराणसीबॉलिवूड