Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक बच्चन झाला मालामाल! इतक्या कोटींना विकलं मुंबईतलं आलिशान अपार्टमेन्ट; किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:06 IST

अभिषेक बच्चनकडून मुंबईतील घराची विक्री! किती कोटींचा झाला करार? प्रति चौरस फूट किंमत जाणून थक्क व्हाल

Abhishek Bachchan: अलिकडच्या काळात, अनेक सिनेस्टार्स मुंबईत मालमत्तांची खरेदी-विक्री करताना दिसत आहेत. तर काहींनी अनेकांनी रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. यामध्ये एकता कपूरपासून जितेंद्र, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, ईशान खट्टर  आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या इतरही काही सिनेस्टार्सच्या नावांचा समावेश आहे. अशातच आता या यादीत बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा देखील समावेश झाला आहे. नावाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानं मुंबईतील  महालक्ष्मी येथे असलेलं त्याचं डुप्लेक्स  अपार्टमेंट कोट्यवधींना विकलं आहे.  त्याने हे लक्झरी अपार्टमेन्ट कितींनी विकलं ते जाणून घेऊया...

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चनने त्याचं हे डुप्लेक्स अपार्टमेंन्ट  १४.५ कोटींना विकले आहे. मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार,अभिषेकचं हे  अपार्टमेंट महालक्ष्मी येथील गोदरेज प्लॅनेट टॉवरमध्ये ४० व्या आणि ४१ व्या मजल्यावर आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार,  २,२४९ चौरस फूट इतकी या अपार्टमेंटची जागा आहे. 

अभिषेकच्या या अपार्टमेंटची प्रतिचौरस फूट किंमत ६४,४७३ रुपये इतकी आहे. या अपार्टमेंटला चार कार पार्किंगचीसुद्धा जागा आहे. दरम्यान, याबद्दल अभिषेक बच्चनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

अभिषेकने यापूर्वीही गुंतवणूक केली आहे

अभिषेकने यापूर्वीच ओबेरॉय रिॲल्टी अपार्टमेंटमध्येही गुंतवणूक केली आहे. 2021 मध्ये, त्याने ओबेरॉय रियल्टीच्या 'ओबेरॉय 360 वेस्ट' प्रकल्पातील एक अपार्टमेंट वरळी, मुंबई येथे 45.75 कोटी रुपयांना विकले. 2014 मध्ये त्याने 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत हे अपार्टमेंट विकत घेतले होते. आणि आता त्याने त्याच डीलरकडून सुमारे 15 कोटी रुपयांना 6 अपार्टमेंट खरेदी केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Bachchan Sells Mumbai Apartment for Millions, Price Stuns!

Web Summary : Abhishek Bachchan sold his luxury duplex apartment in Mumbai's Mahalaxmi for ₹14.5 crore. The 2,249 sq ft apartment, located in Godrej Planet, includes four car parking spaces. He previously invested in Oberoi Realty and sold an apartment in 2021 for a profit.
टॅग्स :अभिषेक बच्चनबॉलिवूडमुंबईबांधकाम उद्योग