बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. 'आय वाँट टू टॉक' या सिनेमासाठी अभिषेकला हा पुरस्कार मिळाला. पण त्यामुळे अभिषेकला गंभीर आरोपाला तोंड द्यावं लागलं आहे. यावर्षी जो फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तो विकत घेतला, अशी टीका अभिषेकवर होत आहे. त्यावर अभिषेकने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाला अभिनेता?
फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला? अभिषेक म्हणालाकाही तासांपूर्वी ट्विटरवर पत्रकार नवनीत मुंद्रा यांनी सोशल मीडियावर अभिषेक बच्चनच्या अभिनयाबद्दल आणि पुरस्कारांबद्दल टीका केली होती. ते लिहितात '"तो एक चांगला व्यक्ती असला तरी, मला हे सांगायला वाईट वाटतं की व्यावसायिक दृष्ट्या, पुरस्कार विकत घेणं आणि तुमचा जनसंपर्क मजबूत ठेवणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन आहे. यामुळे तुमच्या आजवरच्या करिअरमध्ये एकही सुपरहिट सिनेमा नसला तरीही तुम्ही चर्चेत असता.''
''त्याने या वर्षी I Want To Talk या चित्रपटासाठी एक पुरस्कार जिंकला... हा चित्रपट पैसे घेतलेल्या समीक्षकांव्यतिरिक्त कोणीही पाहिला नाही. आणि आता मी हे ट्विट्स पाहत आहे की, २०२५ हे अभिषेकचं वर्ष आहे. हे खूप हास्यास्पद आहे!! त्याच्यापेक्षाही चांगले आणि पुरस्कारांसाठी पात्र असलेले अनेक अभिनेते आहेत. पण दुर्दैव! त्यांच्याकडे PR वापरण्याची हुशारी आणि पैसा नाही."
''तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मी यापेक्षा जास्त मेहनत करेन, जेणेकरून भविष्यात मिळणाऱ्या कोणत्याही यशाबद्दल तुम्हाला पुन्हा कधीही शंका वाटणार नाही. मी तुम्हाला खोटं ठरवेन!" अशाप्रकारे अभिषेक बच्चनने ज्या पद्धतीने टीकाकारांना आपल्या कामातून उत्तर देण्याचा निश्चय व्यक्त केला, त्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
Web Summary : Abhishek Bachchan denies buying his Filmfare award for 'I Want To Talk' after allegations surfaced. He vows to work harder to prove critics wrong and earn future accolades through genuine effort.
Web Summary : अभिषेक बच्चन ने 'आई वांट टू टॉक' के लिए फिल्मफेयर पुरस्कार खरीदने के आरोपों का खंडन किया। उन्होंने आलोचकों को गलत साबित करने और वास्तविक प्रयास से भविष्य में पुरस्कार अर्जित करने के लिए कड़ी मेहनत करने का संकल्प लिया।